आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला : किरीट सोमय्या
नाशिक – छगन भुजबळ यांची मुंबईतील सांताक्रुझ येथे ९ मजली अलिशान इमारत आयकर विभागाने बेनामी मालमत्ता घोषित केली आहे. ज्या इमारतीमध्ये भुजबळ राहता त्याच्याशी काय संबंध, हे मंत्री भुजबळांनी घोषित करावे,तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला. काळा पैसा व्हाईट करण्यासाठी नाशिकमधील आर्मस्ट्राँग ही कंपनी उभी केली. त्यांचा मालक कोण? कुणाकडून ही जागा खरेदी केली याचा भुजबळांना खुलासा करावा अशी मागणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.आपल्या नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी असं आव्हानंही त्यांनी दिलं आहे.
किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमधील आर्मस्ट्राँग या कंपनीची पाहणी केली. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोमय्या यांनी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला आहे. मुळात ज्यांच्याकडून ही कंपनी खरेदी केली ती कंपनीच बनावट आहे. तसेच मुंबईत दहा वर्षांपासून राहत असलेल्या ९ मजली इमारतीचे मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रा. ली. हे दाखवले आहेत. त्यांना तुम्ही भाडं देता की त्यांच्याकडून विकत घेतलं आहे ? त्यांच्या तुमच्याशी काय संबंध हे देखील स्पष्ट करावे.
यावेळी मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लिस्ट मधील बारावा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहेत असे ही किरीट सोमय्या यांनी म्हंटले.