ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकांद्वारे निर्मिती
मुंबई– गो देसी या अस्सल भारतीय चवीच्या स्वदेशी फूड ब्रँडने मार्केट मध्ये ‘देसी पॉप्ज’ म्हणजे देशी स्वाद असलेली लॉलीपॉप बाजारात आणली आहेत. गावागावातील महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजिका गावांतील आपल्या स्वयंपाकघरात हाताने ही लॉलीपॉप बनवतात आणि हे अत्यंत नैसर्गिक पॉप आहेत.
यामध्ये टॅंगी इमली, आंबट कच्चा आम, गोड रियल आम आणि खट्टा निंबू असे विविध फ्लेवर्स आहेत.गो देसीची सर्व उत्पादने शुगर फ्री असून यामध्ये अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह आणि रंग नाहीत. ही देसी पॉप्ज थेट शेतातून आलेल्या ताज्या घटक पदार्थांपासून बनवली जातात. ही उत्पादने २५०- ३२० रुपयांत गो देसीसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.असे गो देसी तर्फे सांगण्यात आले.