नाशिक,दि,१ मे २०२४ – एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नाशिक मतदार संघातील महायुतीचा तिढा अखेर सुटला असून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर झाले आहे. याबाबत शिवसेनेने एक पत्रक काढून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर केले आहे.
काही वेळापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकची जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे सूचक विधान केले होते. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले होते. त्याच वेळी हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असणार असे संकेत मिळाले होते.
अखेर एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळासाहेब वाजे आणि शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.
उद्या सकाळी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024