उद्धव ठाकरेंना मोठा धक्का :विजय करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश 

0

मुंबई,दि,६ मे २०२४ –नाशिक लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विटस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांना आश्वासन देऊन ही तिकीट न दिल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी रात्री उशिरा शिंदे  गटात प्रवेश केला.ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला.त्यानंतर त्यांची शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती झाली असून ते आता जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाले आहेत.करंजकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे.

विजय करंजकर यांनी बंडाचं निशान फडकवलं.आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले.मात्र,करंजकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.त्यांची उमेदवारी हेमंत गोडसे यांना सुध्दा अडचणीची ठरणार होती.त्यामुळे शिंदे गटाने जोरदार फिल्डींग लावून त्यांना आपल्या पक्षात घेतले.आज ६ मे उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने विजय करंजकर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील त्यांच्या माघारीने महायुतीची शक्ती वाढणार आहे.

त्यांच्या पक्ष प्रवेशा प्रसंगी,पालकमंत्री दादा भुसे,सचिव भाऊसाहेब चौधरी,शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते,राजू अण्णा लवटे ,महानगर प्रमुख प्रवीण तिदमे सह विजय करंजकर यांचे समर्थक उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.