मोठी बातमी : नाशिकच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

0

नाशिक,दि,९ मे २०२४ –नाशिक मधून मोठी बातमी हाती येत आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणात नाव आलेल्या नाशिकच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे.मात्र,सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे.दरम्यान बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे.

सलीम कुत्ता प्रकरण नेमकं काय?
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळला. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते. हा मुद्दा दादा भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.