पुणे,दि,२७ मे २०२४ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाच्या दहावीच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे.
कोकण विभाग या निकालात अव्वल ठरला आहे. कोकण विभागात ९९.०१ टक्के निकाल लागला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर आणि तिसऱ्या स्थानावर पुणे विभागाने बाजी मारली आहे. कोल्हापूराचा ९७.४५ आणि पुण्याचा ९६.४४ टक्के निकाल लागला आहे. चौथ्या स्थानावर मुंबईचा विभाग आहे. मुंबई विभागाचा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे. तर नाशिक विभाग ९५. २८ टक्के लागला आहे.दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळ निकाल-
पुणे….९६.४४%
नागपूर …९४.७३%
छत्रपती संभाजीनगर ...९५.१९.%
मुंबई …..९५.८३%
कोल्हापूर ….९७.४५.%
अमरावती ….९५.५८%
नाशिक …..९५.२८%
लातूर …..९५.२७%
कोकण …..९९.०१%
निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?