नाशिकच्या युवकाने तयार केलेल्या पशुमित्र मोबाईल अँप चे ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन
पशुपालक,पशुवैद्यक,पशु सहाय्यक, पशु उद्योजक यांचे साठी उपयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन
नाशिक,दि, १ ऑगस्ट २०२४ –पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन हे पशुपालक,पशुवैद्यक,पशु सहाय्यक,पशु उद्योजक यांचे साठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार असून याचा फायदा पशुपालक यांनी आपला व्यवसाय तांत्रिक ज्ञान अद्यावत करण्यासाठी होणार असून या ह्या ऍप्लिकेशनचा फायदा सर्वानी घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.ना गडकरी यांच्या हस्ते पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन व जय गुरु विमा आणि कृषी पूरक व्यवसाय चे उदघाटन नुकतेच नागपूर येथे करण्यात आले.
नाशिक मधील युवक व कंपनी चे संचालक हेमंत महाजन यांनी पशुमित्र मोबाइल अप्लिकेशन बाबत विस्तृत माहिती दिली.पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन हे पशुपालक,पशुवैद्यक,पशुसहाय्यक,पशु उद्योजक यांचे साठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार असून याचा फायदा पशुपालक यांनी आपला व्यवसाय तांत्रिक ज्ञान अद्यावत करून करावा तसेच पशुपालक, पशु उद्योजक यांनी त्यांची तयार केलेली उत्पादने व पशुधन पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन चे साहाय्याने विक्री केल्यास दलालांची मध्यस्थी संपुष्टात येणार आहे. त्यांना देण्यात येणारे तगडे कमिशन वाचेल. स्वतः पशुपालक, पशु उद्योजक त्यांच्या गायी, म्हशी,शेळ्या मेंढयांची विक्री साठी सविस्तर माहिती किमतीसहित टाकू शकणार असल्याने याचा फायदा खरेदीदार यांना होणार आहे. (या लिंक वरून ऍप डाउनलोड करा
या पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन मुळे गोपालकांना चांगल्या जातीची जनावरे शॊधण्यासाठी पशूंचे आठवडे बाजारात जाण्याची गरज पडणार नसून पशुपालक यांचे गोठ्यातील जनावरांची माहिती मिळणार आहे. तसेच चारा, वैरण, मुरघास, पशुखाद्य विक्रेत्यांना सुध्दा याचा जाहिरातीसाठी फायदा होणार आहे. पशुपालक यांना विविध नोंदणीकृत पशुवैद्यक, पशु मित्र, पशूंची औषधी विक्रेते, रोग निदान प्रयोगशाळा, शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशु वाहतूकदार, प्रशिक्षण संस्था, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, उद्योगासाठी लागणारे साहित्य, उपकरणे विक्रेते, उत्कृष्ट डेअरी फार्म्स, शेळी मेंढी फार्म्स, पोल्ट्री फार्म्स यांची माहिती, ग्रंथालय मध्ये व्यवसाय कारण्यासाठी माहिती, पुस्तके तसेच अनुभव देवाण घेवाण मध्ये तद्न्य पशुवैद्यक यांचे मार्गदर्शन पर विडिओ या ऍप द्वारे मिळणार आहे.
पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास अत्यंत सोपे असल्याने पशुपालक व नवीन व्यवसाय करू इच्छिणारे युवकांना सहज रीतीने वापरता येईल.यावेळी मा. नितीन गडकरी साहेब यांनी पशूंची किंवा उत्पादनाची खरेदी विक्री करतांना फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सूचित केले. तसेच पशुपालक, खरेदीदार यांनी प्रत्यक्ष खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत असा मोलाचा सल्ला दिला. पशुपालक यांना लागणारी सर्व माहिती देणारे असे एकमेव ऍप असून हे ऍप व जय गुरु विमा आणि कृषी पूरक कंपनी पशुसंवर्धन विभागाची क्रांती करेल व बेरोजगार तरुणांना पशु उद्योजक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये पशुवैद्यक किंवा पशुमित्र यांचे मार्फत जाहिरात दिल्यास खात्रीशीर समजण्यात यावी असे संचालक यांनी स्पष्ट केले. यावेळी जय गुरु विमा आणि कृषी पूरक व्यवसाय चे प्रमुख श्री. अभिजित आहेर, तांत्रिक सल्लागार डॉ. प्रमोद महाजन, कोड सिस्टीम कंपनी प्रमुख श्री. मनोज नाफडे, पशुवैद्यक तज्ञ् डॉ. देवेंद्र मोहने, डॉ. प्रमोद मदनकर उपस्थित होते.हे ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोर आणि अँपल स्टोर वरून डाउनलोड करता येणार आहे.
प्रो. एस पी सिंह बघेल केंद्रीय राज्य मंत्री, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास, भारत सरकार, नवी दिल्ली तसेच माजी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री श्रीमती डॉ. भारती ताई पवार यांनाही पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन बाबत माहिती दिली. पशुपालक यांना अत्यंत फायदेशीर असे हे ॲप असून बेरोजगारी कमी होईल, पशुसंवर्धन विषयक व्यवसाय वृध्दींगत होतील असे उदगार माननीय प्रो. प्रो. एस पी सिंह बघेल यांनी सांगितले. तसेच प्रत्येक राज्यात पशुपालक, पशुवैद्यक यांचे होणाऱ्या चर्चासत्रात याची माहिती द्यावी अशी सूचना केली.
डॉ.भारतीताई पवार यांनी या ॲप मुळे पशुपालक करीत असलेल्या व्यवसायास तांत्रिक ज्ञानाची जोड मिळेल व पशूंच्या खरेदी विक्री मध्ये होणारे नुकसान टळेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ . नरवाडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त, नाशिक, डॉ. धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त,नाशिक,डॉ.संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक तसेच मत्स्य विकास विभागाचे उप आयुक्त श्री.प्रदीप जगताप,नाशिक हजर होते.वरील सर्व अधिकारी यांनी पशुमित्र मोबाइल ॲप्लिकेशन सर्व स्तरातील शेतकरी, पशुपालक, पशु उद्योजक, पशुवैद्यक यांना उपयुक्त असल्याचे सांगितले.संचालक हेमंत महाजन यांनी ॲप बाबत सविस्तर माहिती दिली व आभार व्यक्त केले.