महाराष्ट्र गुजरात राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास ट्रक जागेवर सोडून देऊ
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा
महाराष्ट्र गुजरात राज्यमार्गावर सुरू असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला
नाशिक,दि.२५ ऑगस्ट २०२४ – महाराष्ट्र गुजरात राज्य मार्गावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहने अडकून पडले आहे. यामध्ये शेतमालासह औद्योगिक वस्तूंचा सहभाग असून वाहतूकदारांचे प्रचंड नुकसान यात झाले आहे. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू देखील मिळत नसल्याने चालक त्रस्त झाली आहे. तसेच वाहनांचे ई-वे बिल ची मुदत देखील संपली असल्याने वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या राज्यमार्गावरील वाहतूक तातडीने सुरळीत न झाल्यास वाहन चालक आपली वाहने आहे त्या ठिकाणी सोडून जातील असा इशारा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र गुजरात महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने येथील वाहतूक ठप्प होऊन गेल्या काही दिवसांपासून वाणी एकाच जागेवर उभी आहे. यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी जे चालक अडकून पडले आहे. त्या चालकांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे देखील अवघड होऊन बसले आहे. याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधून विनंती देखील केली होती. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.
या राज्यमार्गावर अडकून पडलेल्या वाहनांच्या ई-वे बिल बिलाची मुदत देखील संपली असल्याने असून वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालत येथील वाहतूक सुरळीत करावी अन्यथा चालक आपली वाहने तिथेच सोडून निघून जातील असा इशारा आम्ही नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देत असल्याचे राजेंद्र फड यांनी म्हटले आहे.