Nashik :आता एसटी महामंडळातर्फे त्र्यंबकेश्वर शिर्डी,सिन्नर साठी ई-बस सेवा

काय आहे ई -बसची वैशिष्टे !: बस चे वेळापत्रक पहा 

0

नाशिक,२८ ऑगस्ट २०२४ (किरण घायदार) नाशिककरांसाठी खुशखबर आहे.महाराष्ट्र ई-वाहन धोरण सन २०२१ नुसार रा.प. महामंडळातील किमान १५ टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील वाहने राहतील,असा निर्णय झाला आहे. राज्यातील जनतेला पुरेशा प्रमाणात व पर्यावरण पुरक सेवा देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक बस चालनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात नाशिक विभागात१४ ई-बसेस नाशिक-बोरीवली, नाशिक-स.गड, नाशिक-त्र्यंबक व नाशिक-शिर्डी या मार्गावर चालनात आहे. दुस-या टप्प्यात १० ई-बसेस प्राप्त झाल्या आहे. आज २८ ऑगस्ट पासून  या बसेस नाशिक-शिर्डी, नाशिक-सित्रर व नाशिक-त्र्यंबक मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सकाळी ५.०० ते रात्री १० वाजेपर्यंत दर एक तासाच्या वारंवारीतेने सदरच्या बसेस नाशिक-सित्रर / नाशिक-त्र्यंबक या नविन बसस्थानकावरून (ठक्कर) व नाशिक-शिर्डी महामार्ग बसस्थानक येथुन सुरु होणार आहेत.

बसची वैशिष्टे 
पर्यावरण पूरक सेवा.
बस सेवेमध्ये ५ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत अनुज्ञेय राहील. सदर बस सेवेमध्ये महिला, अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार अर्जुन / द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या विरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास अनुज्ञेय राहील.

बुधवार (ता. २८) पासून या ई- बस भाविक प्रवाशांच्या सेवेत…
सकाळी पाच ते रात्री दहादरम्यान एक तासाच्या फरकाने बस नाशिकहून सिन्नर,त्र्यंबकेश्वरसाठी नवीन सीबीएस बसस्थानकावरून सुटतील.
शिर्डीसाठी बसगाडी महामार्ग बसस्थानकावरून उपलब्ध असेल.
शिर्डीसाठी सकाळी साडेसहा,सात,आठ वाजता,तसेच दुपारी तीन साडेतीन,साडेचार वाजता व अखेरची बस सायंकाळी सातला सोडली जाईल
बघा वेळापत्रक व तिकीट दराचा तक्ता….

E Bus Bus schedule/time Tabel/Nashik : Now E-Bus service for Trimbakeshwar Shirdi, Sinnar by ST Corporation

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.