मुंबई,दि,१२ सप्टेंबर २०२४ –‘बिग बॉस मराठी’चा सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात घन:श्याम दराडे घराबाहेर गेला.आता या शोमध्ये संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्रामच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. आज संग्राम आणि अरबाजची जोरदार वादावादी होताना दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर आता घरातील वातावरण बदलताना दिसत आहे. संग्रामनं पहिल्याच दिवशी अरबाज आणि निक्कीबरोबर पंगा घेतला आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाज संग्राम विरोधात आहे. तसेच संग्राम हा घरातील इतर सदस्यांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये संग्रामने टास्कमध्ये पुन्हा एकदा अरबाजसोबत पंगा घेतलेला दिसत आहे.’बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना ताकदीचा सामना पाहायला मिळेल. अरबाज आणि संग्राम एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसून येतील. अरबाज-संग्रामने केलेले ताकदीचा वापर पाहून घरातील वातावरण मात्र तापणार आहे.