मुंबई,दि १२ सप्टेंबर २०२४ – सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या अशा दोन खगोलीय घटना आहेत,ज्या जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतात. कुठे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तर कुठे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. सप्टेंबर महिना पुन्हा ग्रहण घेऊन येत आहे. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. ते कुठे दिसेल? भारतात ते प्रभावी होईल का? चला जाणून घेऊया
१७ सप्टेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. अनेक ठिकाणी १८ सप्टेंबरलाही पाहता येईल. भारतीय वेळेनुसार सकाळी ६.११ वाजता चंद्रग्रहण सुरू होईल.
भारतात दिसणार चंद्रग्रहण?
ज्या क्षणी ग्रहण सुरू होईल, त्याच क्षणी भारतात सकाळ होईल. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. Space.com नुसार,आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिकेचा काही भाग, तसेच आशिया आणि रशियाच्या पश्चिम भागात आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात पाहता येईल.
चंद्रग्रहणाची वेळ काय आहे
हे ग्रहण भारतात प्रभावी नाही, परंतु जर तुम्हाला या खगोलीय घटनेत रस असेल तर चंद्रग्रहणाची वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यावेळी तुम्ही इंटरनेटवर ग्रहण थेट ऑनलाइन पाहू शकाल. भारतीय वेळेनुसार १८ सप्टेंबरला सकाळी ६:११ वाजता ग्रहण सुरू होईल. वेळ आणि तारखेनुसार त्याचा जास्तीत जास्त परिणाम सकाळी ८.१४ वाजता दिसून येईल. सकाळी १०:१७ वाजता ग्रहण संपेल.