वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरा बाहेर :”अरबाजसोबतची लढाई बाकी आहे”-वैभव चव्हाण 

0

मुंबई,दि, १५ सप्टेंबर २०२४ –महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाणचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला आहे.या आठवड्यात वैभव सह अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलं.

वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खेळण्यात कुठेतरी कमी पडला. वैभव चव्हाण अशी ओळख मिळवण्यापेक्षा ‘अरबाज 2’ अशी ओळख त्याने मिळवली. कधी गद्दारी केल्याने तर कधी रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं लावल्याने तो चर्चेत होता. आता वैभव घराबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

हिरो होण्याची वैभवला अनेकदा संधी मिळाली होती. रितेश भाऊनेदेखील त्याला वारंवार सांगितलं होतं. पण मिळालेल्या संधीचं वैभव सोनं करू शकला नाही. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ वैभव चांगला खेळला. पण तो आणखी चांगला खेळू शकला असता. इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेले 50 पॉईंट्सच्या दोन कॉइनचे नॉमिनी वैभवने जान्हवी आणि अरबाजला दिले.

बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर वैभव चव्हाण म्हणाला,”तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही याचं मला खरचं खूप दु:ख आहे. आता बाहेर पडल्यानंतर मला जान्हवीची खूप आठवण येईल. तर अरबाजसोबतची लढाई अजून बाकी आहे. बाकी सदस्यांना उत्तम खेळण्यासाठी शुभेच्छा देतो”.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!