ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे” द्वादशी श्राद्ध.
चंद्र नक्षत्र – मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी केंद्रयोग आहे. दिलेला शब्द पाळावेत. गृहकर्मे कराल. पशूंचा लाभ होईल. सौख्य लाभेल.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. अचानक आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. बोलताना काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्कारणी लावा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. अधिक मेहनत करावी लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक एखादा खर्च समोर उभा राहू शकतो. महत्वाची कामे शक्यतो आज नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास घडतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. स्वजनाचा विरोध मावळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक कार्य कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. जुने वाद मिटतील. संयमाची भूमिका घ्या. संतती ची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. सन्मान प्राप्त होईल. मातृसेवा करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. इतरांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
.