सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

0

चेन्नई,दि,१ ऑक्टोबर २०२४ –सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा त्रास अचानक वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पत्नी लता यांनी रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत ही माहिती दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रजनीकांत यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली आहे.

रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांची पत्नी लता यांनी एका मीडिया वाहिनीला सांगितले की, सर्व काही ठीक आहे. रजनीकांत यांची प्रकृती गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा खालावली आहे. रजनीकांत यांचे २०१६ मध्ये अमेरिकेत किडनी प्रत्यारोपणही झाले होते.

गेल्या काही आठवड्यांपासून रजनीकांत लोकेश कनगराज दिग्दर्शित त्यांच्या आगामी ‘कुली’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. चित्रपटाचे शूटिंग सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. वेट्टायनच्या ऑडिओ लाँचला उपस्थित | राहण्यासाठी ते २० सप्टेंबर रोजी चेन्नईला गेले होते. ऑडिओ लॉन्चच्यावेळी रजनीकांत यांनी संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि गीतकार सुपर सुब्बू यांच्यासोबत मनशिलायोचे हुकस्टेप सादर केले होते. या कार्यक्रमात त्यांनी जवळपास एक तास भाषणही केले होते. Vettaiyan हा रजनीकांत यांचा आगामी चित्रपट आहे, जो १० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृती बाबतची बातमी समोर आल्यानंतर रजनीकांतच्या चाहत्यांची चिंता थोडी वाढली असून ते लवकरात लवकर बरे होऊन घरी परतावेत अशी प्रार्थना करत आहेत. रजनीकांत यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आपला ठसा उमटवला आणि हे स्थान गाठले. रजनीकांत यांना ४९ वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत असून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे लोकांची लोकप्रियता मिळवली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.