Baba Siddique : बाबा सिद्दीकी त्यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट आली समोर 

0

मुंबई,दि,१३ ऑक्टोबर २०२४ –राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर काल रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.बाब सिद्दीकी गोळीबार प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. चौथा आरोपी या तीनही हल्लेखोरांना मार्गदर्शन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यातच त्यांचा  मृत्यू झाला  वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा गोळीबार झाला आहे. त्यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतलं एकजण फरार आहे फरार आरोपी मुख्य सूत्रधार असल्याचे समजते आहे. पोलिस याचा तपास करत आहेत. आरोपींनी सिद्दिकी यांच्या हत्येसाठी ९.९  एम एम चे पिस्तुल वापरले होते, ते जप्त करण्यात आले आहे. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच अभिनेता संजय दत्त, अभिनेता सलमान खान यांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. सिद्दिकी यांच्या मृतदेहाचे कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर त्यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हत्याप्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागेच संभाव्य कारण समोर आले आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या नेमकी का झाली?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत.

चार जणांनी घेतली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी, २ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते.या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते ४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती असे समजते आहे. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आल्याच हि माहिती समोर येत आहे. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक  सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले या फरार आरोपीच्या शोघासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती

अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपीचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरताय आणि अनेक बाबींचा उलगडा होत आहे.अटक करण्यात आलेल्या शूटर्सचे बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.

बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरताय आणि अनेक बाबींचा उलगडा होत आहे. अटक करण्यात आलेल्या शूटर्सचे बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांना सुपारीचे पैसे अॅडवान्स देण्यात आले असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. गोळीबार करणाऱ्यांनी सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. बंदूक एका शस्त्र विक्रेत्याने कुरिअरच्या मदतीने हल्लेखोरांना दिलं होतं. बंदुकीचे पैसेही आधीच चुकते करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हल्लेखोरांनी दसऱ्याच्याच दिवशी गोळीबार का केला? याची देखील चौकशी सुरु आहे. आरोपी दिड महिन्यापूर्वी मुंबईत आले होते आणि मागील काही दिवसांपासून कुर्ल्यामध्ये वास्तव्यास होते.करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी दोन आरोपींची नावं आहेत तर शिवा असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. करनैल सिंह हा हरियाणाचा तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबार करण्यासाठी तिघे रिक्षानं घटनास्थळी आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकींचं पार्थिव दुपारी वांद्रयातला  निवासस्थानी आणणार आहेत. त्यानंतर मरीन लाईन्स दफनभूमीत बाबा सिद्दीकींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी सहा वाजता बाबा सिद्दीकींचं पार्थीव लिलावतीमधून कूपर रुग्णालयात आणलं गेलं आहे आणि कूपर रुग्णालयात शवविच्छेदन केलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.