विधानसभेसाठी वंचितच्या ३० उमेदवारांच्या नावाची घोषणा : ३ री यादी जाहीर

0

मुंबई,दि,१६ ऑक्टोबर २०२४ – काल पासून आचारसंहिता जाहीर झाल्या नंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची  तिसरी यादी(Vanchit Bahujan Aghadi candidates List )  जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीत ३० उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचित कडून २१ उमेदवारांची घोषणा केली होती. नाशिक मधील देवळाली मतदार संघातील उमेदवाराचे नाव या यादीत समावेश करण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनीही आत्तापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली होती.त्यानंतर आता ३० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे एकूण ५१ उमेदवार निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

वंचित कडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर १० मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

वंचितच्या ३० उमेदवारांची यादी खालील प्रमाणे Vanchit Bahujan Aghadi candidates List Vanchit Bahujan Aghadi candidates List 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.