बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाची मोठी कारवाई,७ डॉक्टरांसह १ परिचारिका निलंबित

0

नाशिक,दि,१७ ऑक्टोबर २०२४ – नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती  जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गरोदर महिलेला मुलगा झाला होता.पण डिस्चार्ज देत असताना हातात मुलगी देण्यात आल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिल्यानंतर मोठा गोंधळ उडाला.या संदर्भात प्रहार संघटनेनं पुढाकार घेत नातेवाईकांना पाठबळ देत थेट सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांना घेरावा घालत विचारपूस केली असता, याप्रकरणी एक कमिटी गठीत केली त्यानंतर बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बाळ अदलाबदल प्रकरणी  ४ मुख्य वैधकीय अधिकारी,३ शिकाऊ डॉक्टर यांच्यासह एक परिचारिका तडकाफडकी निलंबित करण्यात आली आहे, नांदूर नाका येथील महिलेच्या बाळाची अदलाबदल करण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात उघड झाला होता, या हलगर्जीपणा मुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता, या गंभीर प्रकरणात आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.नाशिक शासकीय रुग्णालयात अशा अनेक घटना घडल्या आहेत.याआधी या रुग्णालयात एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्यात आल्याचीही घटना घडली होती.

काय आहे नेमकं प्रकरण ? 
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चर्चेत असतं. आता या रुग्णालयात चक्क बाळाची अदलाबदली झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. प्रीती पवार नावाची महिला रविवारी (१३ऑक्टोबर) रात्री बाळंतपणाला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी या महिलेनं मुलाला जन्म दिला असं सांगण्यात आलं. मुलगा जन्माला आला हे ऐकताच पवार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसंच रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलाच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (१५ ऑक्टोबर) रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांच्या हाती मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे संबंधित महिला आणि कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी मुलगी घेण्यास नकार दिला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता .

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.