नाशिक – नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शाहजी उमाप यांची नेमणूक करण्यात आली आहे.तर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहर पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्त समीर नजीर शेख यांची मुंबई विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी सिद्धेश्वर बाबुराव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या गृह विभागाने आज सायंकाळी भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच राज्य पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह सचिव कैलास गायकवाड यांनी काढले. राज्यातील ३१ पोलीस अधीक्षक, ५४ अप्पर पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, ९२ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.