
नाशिक,दि,२६ नोव्हेंबर २०२४- नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी जाणवत होती गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होतांना दिसत होती आज तापमानाने निच्चांक गाठला असून आज नाशिक व निफाड चे तापमान हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.
निफाडचा पारा घसरला असून ८.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.तर नाशिकचे तापमान १०.८ अंश नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रातील काश्मीर म्हणुन निफाडचा उल्लेख होण्याचा प्रघात यावर्षीदेखील कायम राहिल असे वातावरण तयार होत आहे मंगळवार दि २६ रोजी निफाडचा पारा ८.८ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे
निफाड तालुक्यात गेल्या आठवड्यापासुन बोचरी थंडी जाणवत होती अशातच पारा घसरत गेल्याने थंड हवामान तयार झाले आहे गेल्या दोन दिवसांपासुन पारा घसरल्याने ऊबदार कपड्यांसह शेकोट्यांभोवती राजकिय विश्लेषणाचे फड रंगात आले आहे. कडाक्याच्या थंडिने द्राक्ष बागाईतदारांना चांगलीच हुडहुडी भरली आहे थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवण थबकली आहे.शिवाय उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांत घड जिरण्याची समस्या डोके वर काढत आहे थंडीमुळे द्राक्ष वेलीचे शेंडे पाने मुळे यांचे कार्य अडथळले आहे त्यामुळे द्राक्ष बागाईतदारांना पहाटे ठिबकद्वारे पाणी देणे अथवा परिपक्व होत असलेल्या द्राक्ष बागेत शेकोट्या पेटविणे असे पर्याय करावे लागणार असल्याचे जणाकार द्राक्ष बागाईतदारांचे मत आहे



