सप्तशृंगी गडावरील घाटरस्ता सुरळीत सुरू

0

नाशिक ,दि १० डिसेंबर २०२४ – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २५ नोव्हेंबर ते ९ जानेवारीपर्यंत कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाने टण्याटप्याने रस्ता वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे केळापत्रक जाहीर केले आहे. परंतु, काही लोकांनी घाटरस्ता दिवसभर पूर्णपणे बंद तसेच दोन महिने रस्ता बंद असल्याची अफवा पसरविल्याने येथील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे वित्र बघायला  मिळत आहे. घाटरस्ता सुरळीत सुरू असून, भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार यांनी केले आहे.

या अफवांमुळे देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. येथील लॉजिंग व्यवस्राय, पंचक्रोशीतील खेड्‌यापाड्‌यातील गावातून येणारे, फुलमाळा विकणारे, भाजीपाला विक्रेते, दुग्ध व्यवसाय अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही या घाटरस्ता बंद असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना २४ डिसेंबरपासून नाताळ आणि नववर्ष दरम्यान दि. ५ जानेवारीपर्यंत रस्ता सुरू राहणार आहे.

रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक व झुडपे काढण्यासाठी रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम करण्यासाठी नांदूरी ते सप्तशृंगी गड हे काम सुरु असले तरी  हा घाटरस्ता दिवसभर बंद नाही

व्यवसायिकांना फटका..
गृहकर्ज, चाहनकर्ज, बचत गटाचे हप्ते, बैंकांचे कर्ज घेतल्यामुळे ते फेडायचे कसे असा प्रश्न या अफवेमुळे निर्माण झाला आहे. मुंबई, सुरत, पुणे, नागपूर, मध्यप्रदेश, जळगाव, धुळे, इंदोर आदी ठिकाणांहून भाविक घाटरस्ता बंद आहे का, अशी येथील व्यवसायिकांसह ग्रामस्थांना फोनद्वारे विचारणा करीत आहेत. या अफवेमुळे येथील व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे._
सप्तशृंगी गड घाटरस्ता सोमवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवशी सकाळी सहा ते साडेअकरापर्यंत वाहतुकीसाठी बंद तर मंगळवार, शुक्रवार, रविवार या तीन दिवशी संपूर्ण दिवस रारता बाहतुकीसाठी सुरू असून, या दिवशी काम बंद ठेवण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दर रविवार, मंगळवार, शुक्रवार पहिल्या पायरी येथे कायम भाविकांचा राबता असतो. परंतु, अफवेमुळे या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाटरस्ता सुरळीत सुरू असून, भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सप्तश्रृंगी गडावरील सरपंच रमेश पवार यांनी केले आहे.

रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम करताना सप्तशृंगी गडावर २४ डिसेंबरपासून नाताळ आणि नववर्ष दरम्यान दि.५ जानेवारीपर्यंत रस्ता सुरू ठेवण्यात येणार आहे.यामुळे भाविकांना सुट्धांमध्ये गडावर येण्याचा आणि वेळेत दर्शन घेण्याचा आनंद घेता येणार आहे. सकाळी सहा ते साडेअकरा या कालावधीत नांदरी ते गहरस्ता वाहतुकीसाठी बंद राहील व त्यानंतर तो खुला करण्यात येईल, रोज दुपारी साडेअकरानंतर रस्ता खुल्ला झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

सप्तश्रृंगी गडावरील घाटरस्ता हा दिवसभर बंद नसून, यासाहीवेळ आणि  वार निश्चित केलेले आहेत. सोमवार, दुधवार, गुरुवार या तीन दिवस सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता बंद तर मंगळवार, शुक्रबार, रविवार या तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी सुरु, असे कामाचे नियोजन आहे.दोन-तीन महिन घटरस्ता बंद नहीं. भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे हि  सरपंच रमेश पवार,यांनी सांगितले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.