लढा हा मंत्री पदाचा नाही तर अस्मितेचा आहे -छगन भुजबळ

0

येवला,दि.१७ डिसेंबर २०२४- आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्री पदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आपण अनेक मंत्री पदावर काम केलं आहे. गेली ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्री पदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकराना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ अशा विविध घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात घ्या अशी मागणी उपस्थितांनी केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, एल.जी.कदम, अर्जुन कोकाटे, डॉ.श्रीकांत आवारे, दिपक लोणारी, राजश्री पहिलवान,सुरेखा नागरे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, विनोद जोशी, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, दत्ताकाका रायते, विलास गोरे, शिवाजी सुपणर, अशोक नागरे, संजय पगारे, सचिन कळमकर, कैलास सोनवणे, बालेश जाधव, डॉ.प्रवीण बुल्हे, तानाजी आंधळे, मलिक मेंबर, मतीन अन्सारी, पांडुरंग राऊत, सर्जेराव सावंत, डॉ.वैशाली पवार, अनिल सोनवणे, बबन शिंदे, अशोक संकलेचा, अल्केश कासलीवाल, सोहील मोमीन, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.