नाशिक,दि,६ जानेवारी २०२५ –येथील जय भवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात ७ जानेवारी पासून शाकंभरी नवरात्रोत्सव होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली.
कार्यक्रमाची रुपरेषा
मंगळवार (दि.७) पहाटे देवीची प्रतिष्ठापना व घटस्थापना. बुधवार (दि.८) देवीची अलंकार महापुजा आणि रात्री छबीना. गुरूवार (दि.९) देवीची महापूजा. शुक्रवार (दि.१०) देवीची शेषशाही महापूजा आणि रात्री छबीना. शनिवार (दि.११) सकाळी जलयात्रा आणि भवानी तलवार महापुजा. रविवार (दि.१२) अग्नीस्थापना, होम हवन, नित्योपचार पुजा. सोमवारी (दि.१३) शाकंभरी पोर्णिमा, पुर्णाहुती, घटोत्थापन. मंगळवार (दि.१४) दुपारी महाप्रसाद, रात्री मकरसंक्रात पंचांग श्रवण. दररोज सकाळी व संध्याकाळी साडे सातला आरती होणार आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे वर्षभरात शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र व शाकंभरी नवरात्र असे तीन वेळा नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्या प्रमाणे जयभवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात तीनही नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतलेला आहे. गेल्या वर्षी १५ एप्रिलला या भव्य, आकर्षक मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आजपर्यंत लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उत्कृष्ट रितीने मंदिर उभारणी केल्यामुळे भाविकांचा या ठिकाणी सतत ओघ सुरू असतो. याच वर्षी महाराष्ट्र शासनाने या मंदिराचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या क वर्ग पर्यटन स्थळांमध्ये केलेला असून त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
[…] नाशिक हे धार्मिक व सांस्कृतिक परंपरेने समृद्ध शहर असून कुंभमेळ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही याची विशेष ओळख आहे. अशा पवित्र भूमीवर जगप्रसिद्ध अंकज्योतिष तज्ज्ञ आगमन करत असल्याने नाशिककरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. […]