दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार
महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार : रिलायन्स,अॅमेझॉनचे मोठे करार,15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार
दावोस, दि.23 जानेवारी 2025 – दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.
टोनी ब्लेअर यांची भेटदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.
सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:
21) सिएटक्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्हीगुंतवणूक : 500 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : नागपूर
22) व्हीआयटी सेमिकॉन्सक्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्सगुंतवणूक : 24,437 कोटीरोजगार : 33,600कोणत्या भागात : रत्नागिरी
23) टाटा समूहक्षेत्र : बहुविध क्षेत्रातगुंतवणूक : 30,000 कोटी
24) रुरल एन्हान्सर्सक्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूकगुंतवणूक : 10,000 कोटी
25) पॉवरिन ऊर्जाक्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक: 15,299 कोटीरोजगार : 4000
26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीजक्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 15,000 कोटीरोजगार : 1000
27) युनायटेड फॉस्परस लि.क्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 6500 कोटीरोजगार : 1300
28) ईरुलर्निंग सोल्युशन्सक्षेत्र : शिक्षणगुंतवणूक: 20,000 कोटीरोजगार : 20,000
29) ऑलेक्ट्रा ईव्हीक्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्हीगुंतवणूक: 3000 कोटीरोजगार : 1000
30) फ्युएलक्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदयराज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अॅनालिटिक्सचे प्रशिक्षण………. दि. 21 जानेवारीपर्यंतएकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटीएकूण रोजगार : 1,53,635दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार
31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेटगुंतवणूक: 3,05,000 कोटीरोजगार : 3,00,000
32) ग्रिटा एनर्जीक्षेत्र : स्टील आणि मेटल्सगुंतवणूक : 10,319 कोटीरोजगार : 3200कोणत्या भागात : चंद्रपूर
33) वर्धान लिथियमक्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)गुंतवणूक : 42,535 कोटीरोजगार : 5000कोणत्या भागात : नागपूर
34) इंडोरामाक्षेत्र : वस्त्रोद्योगगुंतवणूक : 21,000 कोटीरोजगार : 1000कोणत्या भागात : रायगड
35) इंडोरामाक्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्सगुंतवणूक: 10,200 कोटीरोजगार : 3000कोणत्या भागात : रायगड
36) सॉटेफिन भारतक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक: 8641 कोटीकोणत्या भागात : एमएमआर
37) ब्लॅकस्टोनक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 43,000 कोटीकोणत्या भागात : एमएमआर
38) सिलॉन बिव्हरेजक्षेत्र : अन्न आणि पेयेगुंतवणूक : 1039 कोटीरोजगार : 450कोणत्या भागात : अहिल्यानगर
39) लासर्न अँड टुब्रो लि.क्षेत्र : संरक्षण उत्पादनगुंतवणूक : 10,000 कोटीरोजगार : 2500कोणत्या भागात : तळेगाव
40) नेल्सन मिडिया प्रा. लि.क्षेत्र : आयटीगुंतवणूक: 450 कोटीरोजगार : 1100कोणत्या भागात : एमएमआर
41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षणगुंतवणूक : 12,780 कोटीरोजगार : 2325कोणत्या भागात : नागपूर
42) एमएसएन होल्डिंग्ज लि.क्षेत्र : सौरगुंतवणूक : 14,652 कोटीरोजगार : 8760कोणत्या भागात : नागपूर
43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.क्षेत्र : ड्रोननिर्मितीगुंतवणूक : 300 कोटीरोजगार : 300कोणत्या भागात : जालना
44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्सक्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक: 5000 कोटीरोजगार : 1300कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र
45) हॅझेरो इंडस्ट्रीजक्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)रोजगार : 10,000कोणत्या भागात : बुटीबोरी
46) टॉरल इंडियाक्षेत्र: अॅल्युमिनियम आणि मेटल्सगुंतवणूक : 500 कोटीरोजगार : 1200कोणत्या भागात : अहिल्यानगर
47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंटक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 43,000 कोटीकोणत्या भागात : एमएमआर
48) हिरानंदानी समूहक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 51,600 कोटीकोणत्या भागात : एमएमआर
49) एव्हरस्टोन समूहक्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 8600 कोटीकोणत्या भागात : एमएमआर
50) अॅमेझॉनक्षेत्र : डेटा सेंटरगुंतवणूक : 71,795 कोटीरोजगार : 83,100कोणत्या भागात : एमएमआर
51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहमक्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधाकोणत्या भागात : एमएमआर
52) एमटीसी समूहक्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्ककोणत्या भागात : एमएमआर
53) क्रॉसरेल इंटरनॅशनलक्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधाकोणत्या भागात : एमएमआर…………..दि. 22 जानेवारीपर्यंतएकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटीएकूण रोजगार : 15.75 लाख