prsanna

आजचे राशिभविष्य सोमवार,३१ मार्च २०२५ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल द्वितीया/तृतीया. विश्वावसु नाम संवत्सर. शके१९४७, संवत २०८१. 
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय तिथी आहे” रवी रेवती नक्षत्रात, मीन राशीत.  
नक्षत्र: अश्विनी/भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. यश मिळेल. सन्मान होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद घटना घडतील. स्वतःसाठी खर्च कराल. भ्रमंती घडेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. शब्दास मान मिळेल. भौतिक सुखे प्राप्त होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. मनासारख्या घटना घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भाग्यातील चंद्र भाग्योदय घडवून आणेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. नवीन खरेदी होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र आहे. मात्र काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल. सन्मान मिळतील. पत्नीचा सल्ला मानणे हिताचे आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज भाग्य उजळेल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. काही गणिते नव्याने जुळतील. व्यावसायिक संधी चालून येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. सरकारी पदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. विक्री करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रवास घडतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!