शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रचारासाठी सायकल रॅली–नाशिकमध्ये उत्साही प्रतिसाद

0

नाशिक,दि ५ एप्रिल २०२५- छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा जागर करणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’ या भव्य सांस्कृतिक उपक्रमाच्या प्रचारासाठी, आजपासून ‘शिवपुत्र संभाजी महाराज सायकल राईड’ ला नाशिकमध्ये उत्साहात सुरुवात झाली.

नाशिक मध्ये ३० एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत साधुग्राम, पंचवटी येथे रंगणार असलेल्या महानाट्याच्या निमित्ताने, ५ एप्रिल ते ५ मे दरम्यान संपूर्ण नाशिक व परिसरात सायकल राईडद्वारे जनजागृती केली जाणार आहे.या राईडचे उद्घाटन आज सकाळी ६ वाजता नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी पुतळा संभाजी महाराज चौक येथून झेंडा दाखवून करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन सॅटरडे संडे ग्रुप मार्फत करण्यात आले असून, गोपाळ पाटील (तळ्याची वाडी व डे केअर शाळेचे संचालक) यांनी या राईडचे संयोजन केले आहे. ३३३ सायकलस्वार शहरातील विविध भागांतून दररोज सायकल चालवत महानाट्याचा प्रचार-प्रसार करत आहेत.या ७ मजली भव्य रंगमंचावर महानाटयच्या प्रमुख भूमिकेत डॉ अमोल कोल्हे यांसह १५० कलावन्त असणार आहेत

आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. पी. एम. सैनी (सेवानिवृत्त अधिकारी, एरवींग), मोहिनी ज्वेलर्सचे संचालक भालचंद्र पावटेकर, कौस्तुभ मेहता, योगेश आडभाई,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. अॅड. नितीन ठाकरे, गोपाळ पाटील आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सायकलपटूंचाही सत्कार करण्यात आला.

सायकल राईडचा मार्ग सिटी सेंटर मॉल – एबीबी सर्कल – महात्मा नगर – कॉलेज रोड – गंगापूर नाका – अशोकस्तंभ – सी. बी. एस. – त्र्यंबक नाका – कालिदास कला मंदिर असा होता. समारोप कालिदास कला मंदिर येथे झाला, जिथे उपस्थित मान्यवरांनी नाशिककरांना ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.तृप्तीदा काटकर, एस. पी. आहेर, ताजनपुरे, गोविंद शिंदे व अनेक सायकलप्रेमींनी या उपक्रमाच्या यशासाठी अथक मेहनत घेतली.

ही सायकल राईड संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार समाजात पोहोचवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरत आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य नाशिककरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा ठेवा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!