मुंबई,दि,१७ एप्रिल २०२५ – अमेरिकेत ट्रम्प यांनी घेतलेल्या आक्रमक निर्णयांमुळे जागतिक मंदीचा धोका वाढल्याचं चित्र आता सर्वत्र दिसते आहे. सोन्याच्या दरात बुधवारी १६५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर लवकरच एक लाखांच्या वरती जाणार असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली जात आहे. तसेच अलीकडे जागतिक स्तरावर घडलेल्या काही आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या सोन्याने प्रतितोळा 98 हजारांवर (Gold Rates Today) झेप घेतली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे. एक लाखापासून सोनं अवघं दोन हजार रूपये दूर आहे.
१० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आता १ लाख रुपये मोजावे लागतील असा अंदाज दिसतोय. सध्या सोने एक लाखांच्या टप्प्यात आहे. तर काही तज्ज्ञ सोन्याच्या किंमती 43 टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचा दावा करत आहेत.तर काहींच्या म्हणण्या नुसार येत्या ३० एप्रिल रोजी अक्षय तृतिया असून त्या दिवशी सोन्याचे भाव हे एक लाखाहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यानंतर लग्नसराई आणि दिवाळीचा सण असल्यानेही सोन्याच्या दरात अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.