Nashik -पापड महोत्सवातून ७५ लाखाची आर्थिक उलाढाल

महिला सुगरणींसाठी लवकरच स्वतंत्र महिला क्लस्टरची निर्मिती; मनपा देणार जागा : आयुक्त मनिषा खत्री 

4

नाशिक,दि, १९ एप्रिल २०२५ –नाशिक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील महिला सुगरणींत अनेक क्षमता आहे.समाजातील वंचित महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला स्वयंरोजगार क्लस्टर निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी केले.

सहकार भारती, राणी भवन आणि विश्वास रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका मंगल कार्यालयात शनिवार आणि रविवारी दोन दिवसीय पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन आयुक्त मनिषा खत्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ठाणे जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. अश्विनी बापट, हॉटेल टेरोटेलचे संचालक नचिकेत लवाटे यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती.

या महोत्सवात नाशिक शहर व जिल्ह्यातील सुगरणी, महिला बचत गट तसेच श्री गुरुजी रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या संकल्प सेवा समितीच्या आदिवासी पाड्यांवरच्या महिलांचे विविध प्रकारच्या वाळवणचे एकूण ४७ स्टॉल उभारण्यात आले होते.  त्यात विशेषतः नागली पापड, उडीद पापड, तांदूळ पापड, ज्वारी पापड, बटाटे पापड, भगर पापड, कुरडई, मुगवडे यासह विविध प्रकारचे पापड आणि इतर वाळवणाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते. या दोन दिवसीय महोत्सवास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ६० हजारांहून अधिक महिलांनी खरेदीचा आनंद लुटला असून तब्बल ७५ लाखांची आर्थिक उलाढाल झाली. नाशिकच्या धर्तीवर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रदेश संघटन मंत्री शरद जाधव यांनी सांगितले.

यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सौ. संगीता मुसळे, दिपाली भावे, मंजुषा भूमकर, रेखा अमृतकर, चैताली अमृतकर,  या स्टाॅल धारीककांना तर भेट देणा-या महीला मधुन सौ. मानसी जोशी आणि अनुराधा देशपांडे या महीलांना  सोनी पैठणीच्या वतीने पैठणी देण्यात आली. तर दोन उत्तेजनार्थ बक्षीसे सौ.सीमा दत्ता गुजराथी यांचे वतीने देण्यात आले.

या पापड महोत्सवाचा समारोप माजी केंद्रीय मंत्री सौ.भारती पवार व गुरुजी रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डाॅ.मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. उद्योजक मिलिंद देशपांडे, माजी नगरसेविका अश्विनीताई बोरस्ते , भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सोनल दगडे, रोहिणी नायडू, सेवानिवृत्त उपायुक्त सौ.सुचेता लासुरे. रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोडके, हेरंब गोविलकर, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी सुधीर पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डाॅ. विजय मालपाठक, कार्यवाह सुहास वैद्य, सहकार्यवाह रोहित गायधनी, महाराष्ट्र बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेच्या, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डॉ. डी. एम. गुजराथी, अमिता नेरकर, सुजाता कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, संजय सुर्यवंशी, शिरीष भालेराव, डॉ. प्रशांत पुरंदरे आदींनी मोठे परिश्रम घेतले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

4 Comments
  1. […] घटक बनले आहेत. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, तसेच घरगुती कामांसाठी आपण या तिन्ही […]

  2. […] गरम मसाला – १ टीस्पून मीठ – चवीनुसार कोथिंबीर – […]

  3. […] संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नव्या […]

  4. […] व्यावसायिकांच्या संघटनेच्या कार्यकारिणी निवडीत यंदाही बिनविरोध निवडीची […]

Don`t copy text!