थायलंड म्यानमारनंतर आता इस्तंबूलमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप  

एका तासात तीन मोठे भूकंप : व्हिडिओ पहा

0

इस्तंबूल,दि, २४ एप्रिल २०२५ –थायलंड म्यानमारनंतर आता तुर्कीमधील इस्तंबूल येथे ६.२ रिश्टर स्केलचा शक्तिशाली  भूकंप झाला आहे . भूकंपाचे केंद्र केंद्र इस्तंबूलजवळील मारमारा समुद्रात होते. तुर्कीचे मंत्री अली येरलिकाया म्हणाले की, भूकंपानंतर ५१ धक्के देखील जाणवले. अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, परंतु भीतीमुळे अनेक लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, ज्यामुळे १५१ लोक जखमी झाले आहेत .गरज नसल्यास गाडी चालवू नका किंवा मोबाईल फोन वापरू नका. लोकांना नुकसान झालेल्या इमारतींमध्ये जाऊ नका असा इशारा देण्यात आला आहे.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनेही भूकंपाची पुष्टी केली आणि सांगितले की भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होते. शहर आणि परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचे धक्के 440 किमी अंतरावर असलेल्या राजधानी अंकारामध्येही जाणवले. सिलिवरी जिल्ह्यातील ज्या भागात हा भूकंप झाला तो भाग भूकंपीय गतिविधीसाठी ओळखला जातो.

एका तासात तीन मोठे भूकंप झाले असून पहिला भूकंप ३.९ तीव्रतेचा, सिलिवरी जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळ स्थानिक वेळेनुसार १२:१३ वाजता झाला दुसरा भूकंप स्थानिक वेळेनुसार १२: ४९ वाजता त्याच भागात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला.तर तिसरा भूकंप  इस्तंबूलच्या ब्युकेकमेसे जिल्ह्यात स्थानिक वेळेनुसार १२:५१ वाजता ४.४ तीव्रतेचा होता

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!