‘ऑपरेशन सिंदूर’:’भारतावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता,म्हणून प्रत्युत्तर द्यावं लागलं
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईत १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार करण्यात आले.
नवी दिल्ली, ७ मे २०२५ –India Air Strikes Back पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभर संतापाचा उद्रेक झाला आणि ‘बदला घे’ अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर काल रात्री भारताने पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले.
भारतीय हवाई दलाने १:३० ते १:५१ या वेळेत ९ दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ला करून त्यांना पूर्णपणे उध्वस्त केले. या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाल्याचे लष्कराच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “भारतावर पुन्हा हल्ला होण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट भारतालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.”
हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि सिंधमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत अचूक हल्ले केले. या तळांमध्ये TRF (The Resistance Front) च्या अतिरेक्यांचे प्रशिक्षण सुरु होते. ही संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे.
India Air Strikes Back कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केले की, “गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना संरक्षण देतो आहे. हे थांबवणे आता आवश्यक होते. पहलगाममध्ये जो क्रूर हल्ला झाला, तो मानवतेला काळिमा फासणारा होता.”
भारताने सिंधू जल करारालाही स्थगिती देत पाकिस्तानसोबतचे संबंध तात्पुरते तोडले आहेत. सरकारने घेतलेल्या या पाच धाडसी निर्णयांमुळे पाकिस्तानवर जागतिक दबाव वाढला आहे.
[…] […]
[…] […]