भारत-पाकिस्तान युद्धाचा धोका:सीमेकडे सरकतेय पाकिस्तानी फौज,भारत सरकारने दिला हायअलर्ट

कर्नल सोफिया कुरैशींचा पाकिस्तानला कडक इशारा

1

नवी दिल्ली, दि,१० मे २०२५ —India Pakistan War  भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की,युद्ध भारताला नको आहे.मात्र, पाकिस्तानच्या आक्रमक आणि उकसवणाऱ्या कारवायांमुळे भारतीय सैन्य सज्ज असून, कठोर प्रत्युत्तर देत आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारतीय लष्कराच्या दोन शूर महिला अधिकारी — कर्नल सोफिया कुरैशी आणि मेजर व्योमिका सिंह — यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाविषयी माहिती दिली.

मिसरी यांनी सांगितले की, “पाकिस्तान सातत्याने अशांतता निर्माण करणाऱ्या हालचाली करत आहे. त्यांनी पश्चिमी सीमेवर आपली फौज हलवून परिस्थिती अजूनच चिघळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.” यामुळे दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष युद्धाची शक्यता वाढली आहे.

कर्नल सोफिया कुरैशींचा पाकिस्तानला कडक इशारा(India Pakistan War)

कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पाकिस्तानने पंजाबमधील एअरबेसना लक्ष्य करत हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी लॉन्ग-रेंज शस्त्रसज्जता, लोइटरिंग म्युनिशन आणि फायटर जेट्सचा वापर करत हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय लष्कराने बहुतेक सर्व आक्रमण निष्फळ ठरवले.

तसेच कुरैशी यांनी एक गंभीर बाब अधोरेखित करत सांगितले की, पाकिस्तानने लाहौरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांचा वापर लष्करी उद्दिष्टांसाठी केला. हे केवळ आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही, तर मानवी मूल्यांनाही तडा देणारे कृत्य आहे.

भारताच्या लष्करी स्थळांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. भारताने अनेक धोके निष्प्रभ केले, परंतु पाकिस्तानने 26 हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उधमपूर, भुज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर आमच्या उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान केलं. तसेच पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.

भारत सरकारने सध्या संपूर्ण पश्चिमी सीमांवर हाय अलर्ट जारी केला असून, नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!