श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज: दल लेकमध्ये ‘मिसाईलसदृश’ वस्तू आढळल्याने खळबळ
श्रीनगर, दि. १० मे २०२५ – Dal Lake Srinagar जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात शनिवारी पहाटे जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली.दल लेकच्या मध्यभागी एक ‘मिसाईलसदृश’ वस्तू कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, तर सुरक्षादलांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला.
सुरक्षा यंत्रणांनी त्या अज्ञात वस्तूचा संपूर्ण अवशेष बाहेर काढला असून, त्याचे विश्लेषण सुरू आहे. या घटनेनंतर श्रीनगरच्या बाहेरील लसजन परिसरात आणखी एक संशयास्पद वस्तू सापडली, तीही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.
दल लेक ही एक प्रमुख पर्यटक आकर्षण स्थळ असून, अशा प्रकारची घटना येथे घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत देशाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
महत्त्वाचे मुद्दे: (Dal Lake Srinagar)
स्फोटांनंतर डल लेकच्या पाण्यावरून धुराचे लोट उठले
संशयित वस्तू सुरक्षादलांकडून जप्त, तपास सुरू
लसजनमध्येही एक संशयित वस्तू सापडली
सुरक्षा यंत्रणांनी परिसरात गस्त वाढवली
श्रीनगरमध्ये वाढत्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत, तर अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरु आहे
VIDEO | A missile-like object landed deep inside the Dal Lake — a major tourist attraction in Srinagar — after loud explosions rocked the city on Saturday morning, officials said.
Smoke bellowed from the surface of the lake when the object landed, the officials said.… pic.twitter.com/qC8a6vNKsr
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
[…] […]