माजीमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटींची खंडणी मागणारा तरुण जेरबंद

1

नाशिक, १७ मे २०२५ – Chhagan Bhujbal Latest News माजीमंत्री छगन भुजबळ यांना आयकर अधिकाऱ्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणास अखेर पोलिसांनी जेरबंद केले. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने वेशांतर करून गुजरातमधील धरमपूर येथून या तरुणाला अटक केली.

अटक केलेल्या तरुणाची माहिती:(Chhagan Bhujbal Latest News)
राहुल दिलीप भुसारे (वय २७, रा. करंजाळी, ता. पेठ, जि. नाशिक) हा तरुण बी.एस्सी. शिक्षण घेतलेला असून सध्या बेरोजगार आहे.

खंडणी मागण्याचा प्रकार:
२३ एप्रिल रोजी माजीमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे राहुल भुसारे याने स्वतःला आयकर विभागाचा अधिकारी सांगून कॉल केला. त्याने त्र्यंबकेश्वर येथील फार्महाऊसवर कारवाई करण्याची धमकी देत एक कोटी रुपये खंडणी म्हणून मागितले. मात्र भुजबळ यांचे कॉल्स स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याकडे डायव्हर्ट असल्याची माहिती संशयिताला नव्हती.

सापळा आणि अटक:
पोलिसांनी डमी साक्षीदाराच्या साहाय्याने सापळा रचला. संशयिताने अनेकदा ठिकाणं बदलली. अखेर करंजाळी येथील ‘हॉटेल रितम व्हॅली’ येथे त्याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक दुचाकी, मोबाईल, ५०० रुपयांच्या नोटा, खेळण्याच्या नोटांचे बंडल, रद्दी पेपर असा एकूण ८५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांची कारवाई:
संशयित राहुल भुसारे याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिकृत माहिती:
“हा प्रकार झटपट पैसे मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आला असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे,” असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अखेर पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ […]

Don`t copy text!