रविवारी नाशिकच्या “या” भागात वीजपुरवठा खंडित

महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीची कामे

2

नाशिक, १७ मे २०२५ – Power Cut Nashik महावितरणच्या नाशिक शहर विभाग-२ अंतर्गत येणाऱ्या उपनगर कक्षातील वीजपुरवठा रविवार, १८ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:३० या वेळेत टप्याटप्याने खंडित राहणार आहे. १३२ केव्ही टाकळी उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवरील झाडांच्या फांद्या काढणे व विविध विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महावितरणने ग्राहकांना याची पूर्वसूचना देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वीजपुरवठा बंद राहणारे भाग – उपकेंद्रनिहाय माहिती:(Power Cut Nashik)
१) ११ केव्ही गांधी नगर वाहिनीवरील भाग:

अभीष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर, दीप नगर, विद्युत कॉलनी, सहकार कॉलनी, एनके नगर, एलआयसी सोसायटी, छोटी जनता परिसर, आंबेडकर नगर, जेके टायर जवळ, टागोर नगर, सिद्धार्थ नगर.

२) ११ केव्ही समता नगर वाहिनीवरील भाग:

टाकळी रोड, समता नगर, इंद्रायणी सोसायटी, रामदास स्वामी नगर, खोडदे नगर, साळवे मळा, राहुल नगर, सोनवणे बाबा चौक, शांती पार्क, फुलसुंदर, जामकर मळा, शेलार फार्म.

३) ११ केव्ही इच्छामणी  वाहिनीवरील भाग:

पगारे मळा, अयोध्या नगर, इच्छामणी मंदिर परिसर, शिंदी कॉलनी, खोडदे नगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, शांती पार्क, श्रम नगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी, जुनी चाळ.

४) ११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीवरील भाग:

टागोर नगर, डीजीपी नगर, रविशंकर मार्ग, वडाळा शिवार.

५) ११ केव्ही गांधी नगर एनएमसी वाहिनीवरील भाग.
६) ३३ केव्ही गॅरीसन वाहिनीवरील भाग.
७) ११ केव्ही आर्टिलरी वाहिनीवरील भाग:

मनोहर गार्डन, जयभवानी रोड, जेतवन नगर.

८) ११ केव्ही नाशिक रोड वाहिनीवरील भाग:

नाशिक-पुणे रोड, उपनगर पोलीस स्टेशन, आयएसपी क्वार्टर, एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट.

महावितरणने यासंदर्भात ग्राहकांना उपयुक्त नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांना वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. […]

  2. […] उपकेंद्रात रोहित्र क्षमतावाढ – इंदिरा नगर भागातील वीजपुरवठा […]

Don`t copy text!