मुंबई, दि. १९ मे २०२५ – Shilpa Shirodkar news बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १८’ स्पर्धक शिल्पा शिरोडकर हिला करोनाची लागण झाली आहे. तिनं स्वतः सोशल मीडियावरून कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया सुरक्षित रहा, मास्क वापरा,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
करोना पुन्हा डोकं वर काढतोय का?
आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतातही खबरदारीची गरज असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. अशातच शिल्पा शिरोडकरच्या संसर्गाची बातमी येणं चिंतेची बाब आहे.
शिल्पाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त (Shilpa Shirodkar news )
शिल्पाच्या करोना पॉझिटिव्ह पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हा – “हे देवा! शिल्पा, स्वतःची काळजी घे. लवकर बरी हो.”
जुही बब्बर – “स्वतःची काळजी घे.”
इंदिरा कृष्णा, चुम दरांग आणि नम्रता शिरोडकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
शिल्पा शिरोडकर – कारकिर्दीवर एक नजर
शिल्पाने १९८९ ते २००० या काळात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नंतर १३ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘एक मुट्ठी आसमान’ या मालिकेतून पुनरागमन केलं. २०२४ मध्ये ती ‘बिग बॉस १८’ या रिऍलिटी शोमध्ये झळकली होती. तिच्या अभिनयाची खास शैली आणि प्रेक्षकांशी असलेली नाळ अजूनही टिकून आहे.