ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक Today RashiBhavishya
🔯 शुभ नक्षत्र: आश्लेषा / मघा
🧘 ध्रुव योग | नक्षत्र गंडांत: शांती आवश्यक
🕓 राहुकाळ: दुपारी ४.३० ते ६.००
🟧आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क/सिंह. (ध्रुव योग/ नक्षत्र गंडांत शांती)
“आजचा दिवस नवचैतन्याने भरलेला आहे. प्रत्येक क्षणात नवी शक्यता दडलेली आहे!”Today RashiBhavishya
🔴 मेष (Aries):
संमिश्र दिवस. धावपळ वाढेल, पण शेतीसंबंधित कामात प्रगती. प्रवास संभवतो.
🟠 वृषभ (Taurus):
आर्थिक लाभांचे योग. चंद्र तृतीय स्थानी. आनंददायी बातम्या. नवे सौख्य लाभेल.
🟡 मिथुन (Gemini):
वक्तृत्व चमकेल. संवादात यश. आर्थिक बाबतीत स्थैर्य. दिवस अनुकूल.
🔵 कर्क (Cancer):
चंद्र तुमच्याच राशीत. व्यवसायात वाढ. मात्र गुरू प्रतिकूल — संयम ठेवा.
🟣 सिंह (Leo):
व्ययस्थानी चंद्र. खर्च वाढतील. जुनी कामं डोकं वर काढतील. शांत राहा.
🟢 कन्या (Virgo):
लाभस्थानी चंद्र. व्यवसायात यश. नवे संधीचे दरवाजे उघडतील.
🟤 तुळ (Libra):
कामाचा ताण वाढेल, पण यशाची नांदी. नोकरीतील संधी घालवू नका.
🟥 वृश्चिक (Scorpio):
आर्थिक कामांत यश. नवीन वाटा सापडतील. दिवस उत्साहवर्धक.
🟧 धनु (Sagittarius):
संमिश्र दिवस. अष्टमस्थानी चंद्र. महत्त्वाचे निर्णय टाळा. संयम ठेवा.
⬛ मकर (Capricorn):
सकारात्मक दिवस. आत्मविश्वास वाढेल. सौख्य व समाधान.
🟪 कुंभ (Aquarius):
कायदेशीर बाबतीत काळजी घ्या. प्रवास घडतील. अहंकार टाळा.
🟩 मीन (Pisces):
अनुकूल ग्रहमान. अडचणी दूर होतील. अपेक्षित यश थोडं लांब आहे.
१ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:–
तुमच्यावर रवि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला शास्त्राची आवड आहे. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. खेळण्याची हौस आहे. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला आवड आहे.तुम्ही जे कार्य हातात घेतात त्यात तुम्हाला यश मिळते कारण तुमचे नियोजन चांगले असते. तुम्हाला गूढ विद्यांची देखील आवड आहे. तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. सौंदर्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे.
तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही गर्दीमध्ये लोकप्रिय असतात. नीती आणि आणि अनीती याबद्दल तुमच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. तुम्ही सतत उद्योग मग्न असतात. उद्योग प्रिय आहात. तुम्ही कायम उत्साह मूर्ती असतात. इतरांचा तुम्ही आदर करतात. इतरांना तुम्ही तणावापासून मुक्त करतात. तुम्ही फार सखोल अभ्यास करणारे जरी नसले तरी तुमचे वक्तृत्व चांगले असते. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुम्ही संशोधक असाल आणि त्याचा जगाला कसा फायदा होईल याचा विचार करतात. तुम्ही जसे व्यवहारी आहात तसे दानधर्म करणारे देखील आहात.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, चित्रपट निर्माते, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर, दिग्दर्शक, बँकिंग, औषधाचे दुकान, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वकिली.
शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:– सोनेरी.
शुभ रत्न:- पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📌 व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
📱 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
📘 ‘राशीभाव’ फेसबुक पेजला जरूर भेट द्या!

[…] तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही […]
[…] जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/ कन्या. (वज्र योग् […]