संयमी जीवनशैलीनेच आजारांवर नियंत्रण शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
नाशिक,२ जून २०२५ – Saibaba Hospital Nashik “नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आधुनिक वैद्यकीय उपचार पुरेसे नाहीत, तर संयमी आणि संतुलित जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे केले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरच्या(Saibaba Hospital Nashik) उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, तसेच हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी व डॉ. पल्लवी धर्माधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,“साईबाबांचे श्रद्धा आणि सबुरीचे तत्त्व जर आपण आचरणात आणले, तर जीवनशैलीशी निगडित आजार टाळता येतात. या हॉस्पिटलमुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे.”
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:
२०० खाटांची सुविधा
२४x७ आपत्कालीन सेवा
अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम
६ आधुनिक ऑपरेशन थिएटर्स
२ अत्याधुनिक कॅथलॅब्स
सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार उपलब्ध
डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी यावेळी रुग्णसेवेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला आणि गरिबातील गरिबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपर्क:
श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
📞 ७०४१७०४११४