मुंबई, दि. ३० जून २०२५ —(The Family Man Season3) प्राइम व्हिडिओने आज ‘द फॅमिली मॅन’या बहुचर्चित वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या थरारक गुप्तहेर-कथेची निर्मिती D2R Films अंतर्गत झाली आहे. या सिझनमध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारी या पात्रात झळकणार असून, यंदा त्याला दोन नव्या धोकादायक शत्रूंना – जयदीप अहलावत आणि निम्रत कौर – सामोरं जावं लागणार आहे.
या सिझनमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या संकटांशी दोन हात करताना श्रीकांत वैयक्तिक आयुष्यातही नव्या संघर्षांना तोंड देताना दिसणार आहे. यासोबतच सुचित्रा तिवारी (प्रियमणी), जेके तलपडे (शारिब हाशमी), धृति (आशलेशा ठाकूर) आणि अथर्व (वेदांत सिना) हे पात्रेही महत्त्वाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत.
राज, डीके, सुमन कुमार आणि तुषार सेठ यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली साकारलेली ही सिरीज(The Family Man Season3) एका नव्या उंचीवर नेण्यात आली आहे. प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्स प्रमुख निकिल माधोक म्हणाले, “द फॅमिली मॅन “ही फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय फ्रँचायझी आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांनुसार हा सिझन आणखी उत्कंठावर्धक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
राज आणि डीके म्हणाले, “या सिझनमध्ये आम्ही श्रीकांतच्या भूमिकेत अधिक भावनिक आणि थरारक खोलवर जाण्याचा प्रयत्न केला आहे. जयदीप आणि निम्रत यांच्या सहभागामुळे कथेला एक नवा आयाम मिळाला आहे.”