क.का.वाघ महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्समध्ये ‘एआय’शिकवणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अभ्यासक्रम सुरू

0

नाशिक, दि. ६ जुलै २०२५ – Artificial Intelligence Courses,Nashik मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक सायन्स अभ्यासक्रमांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शिकवले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत या नवीन विषयाची भर घालण्यात आली असून, विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश जाधव आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक भगवान कदलाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, AI अभ्यासक्रमासाठी केवळ २४ मर्यादित जागा असून प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. किरणकुमार जोहरे (9130751051) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा.

AI सर्व शाखांसाठी उपयुक्त:(Artificial Intelligence Courses,Nashik)
भारत सरकारने २०२५ हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांसाठीही AI हे क्षेत्र नवीन करिअरच्या संधी निर्माण करणारे ठरणार आहे. आर्थिक स्वावलंबन आणि उद्योगक्षमतेसाठी आवश्यक कौशल्य म्हणून महाविद्यालय AI विषयावर विशेष अभ्यासक्रमही राबवणार आहे.

प्राचार्य डॉ. जाधव यांनी सांगितले की,मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर AI रिसर्च सेंटर स्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!