‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रदर्शित
टीझरला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद :शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडके
मुंबई, दि. ६ जुलै २०२५ – Punha Shivajiraje Bhosale teaser महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचा भव्य चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली साकारलेला हा सिनेमा, फक्त इतिहास नव्हे तर आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी विचारमंच ठरणार आहे.
शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडके झळकणार असून, नुकतीच प्रदर्शित झालेली चित्रपटाची पहिली झलक आणि ‘राजं… राजं’ हा संवाद ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले आहेत. या झलकात बालकलाकार त्रिशा ठोसर हिचाही सहभाग दिसून येतो.
चित्रपटाच्या टीझरचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतर करण्यात आले. निर्माता राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी या चित्रपटासाठी मोठा खर्च आणि सशक्त टीम उभी केली आहे.
“शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नव्हे, ते एक जागरूक करणारा विचार आहे. या चित्रपटातून आम्ही काळाच्या अंधारात आशेचा प्रकाश पेरायचा प्रयत्न केला आहे,” असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलं.
( Punha Shivajiraje Bhosale teaser )या चित्रपटात शिवरायांचं धाडसी नेतृत्व, त्याग, आणि दूरदृष्टी यांचं चित्रण केवळ ऐतिहासिक घटनांपुरतं मर्यादित नसून, ते आजच्या समाजातील निराशा, अस्थिरता आणि अंधश्रद्धेवर भाष्य करणारं असेल.
[…] ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या … […]