आजचे राशीभविष्य – मंगळवार, ८ जुलै २०२५

८ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये

1

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya Today)
🗓️ आषाढ शुक्ल त्रयोदशी • भौम प्रदोष व्रत • ज्येष्ठा नक्षत्र • वर्ज्य दिवस
📅 आज जन्मलेल्यांची राशी – वृश्चिक
🕒 राहूकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०

(Marathi Rashi Bhavishya Today)

♈ मेष
दिवस अनुकूल नाही, सावध राहा.
शत्रू त्रास देतील. प्रवास टाळा. काही अनपेक्षित घडामोडी होतील.
🔹 टीप: धाडसी निर्णय टाळा, वादांपासून दूर रहा.
🧘 उपाय: मारुती उपासना करा, मंगळवारी भाकर चढवा.

♉ वृषभ
आर्थिक लाभ, पण मानसिक अस्वस्थता.
पत्नीचा सल्ला उपयुक्त. अनामिक भीती दाटेल.
🔹 टीप: शांत राहा, भावनिक निर्णय टाळा.
🧘 उपाय: शुक्रवारपर्यंत रोज लक्ष्मी स्तोत्र पठण करा.

♊ मिथुन
कटकटी व मालमत्तेचे वाद संभवतात.
घरगुती वातावरण तापू शकते. धार्मिकता उपयोगी.
🔹 टीप: किरकोळ वाद टाळा.
🧘 उपाय: दत्त उपासना, घरात शांतता राखा.

♋ कर्क
घरेलू कामात यश, अचानक धनलाभ.
शेअर्समध्ये फायदा, सरकारी कामात विलंब.
🔹 टीप: कायद्याचे पालन आवश्यक.
🧘 उपाय: कुबेर पूजा करा, आर्थिक निर्णयात संयम ठेवा.

♌ सिंह
प्रशंसेची अपेक्षा अपूर्ण.
मित्रांशी गैरसमज संभवतो, राजकीय क्षेत्रात यश नाही.
🔹 टीप: आत्मचिंतन करा, अहंकार टाळा.
🧘 उपाय: सूर्यनमस्कार व आदित्यहृदय स्तोत्र पठण.

♍ कन्या
प्रशस्त ग्रहमान, आर्थिक यश.
व्यवसायात वाढ, लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
🔹 टीप: निर्णयात स्थिरता ठेवा.
🧘 उपाय: गणपती अथर्वशीर्ष वाचन करा.

♎ तुळ
सिद्धी व आत्मविश्वासाचा दिवस.
धार्मिक कार्य, ध्यान व सकारात्मक ऊर्जा लाभेल.
🔹 टीप: आज कर्ज घेणे टाळा.
🧘 उपाय: विष्णू सहस्त्रनाम पठण.

♏ वृश्चिक
उत्कृष्ट दिवस पण सावधगिरी हवी.
भरभराट, पण वादविवाद किंवा कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकता.
🔹 टीप: संयम ठेवा, राजकीय वाद टाळा.
🧘 उपाय: रुद्राभिषेक व ॐ नमः शिवाय जप.

♐ धनु
प्रतिकूल ग्रहमान.
अडचणी असतील पण मार्ग सापडेल. खर्च वाढेल.
🔹 टीप: विचारपूर्वक निर्णय घ्या.
🧘 उपाय: श्रीराम रक्षा स्तोत्र पठण.

♑ मकर
प्रगतीचा दिवस.
बढतीचे योग, शेअर्समध्ये लाभ संभवतो.
🔹 टीप: ११ ते २ या वेळेत सतर्क राहा.
🧘 उपाय: शनैश्चर स्तोत्र, काळ्या वस्त्राचा उपयोग करा.

♒ कुंभ
नुकसानाचा धोका, संयम आवश्यक.
शेअर्स/लॉटरीपासून दूर रहा. अध्यात्मात समाधान.
🔹 टीप: खर्चावर नियंत्रण ठेवा.
🧘 उपाय: गुरु स्तोत्र व ध्यान साधना.

♓ मीन
मिश्र परिणामांचा दिवस.
अति धाडस टाळा. दानधर्म शुभ. मानसिक समाधान मिळेल.
🔹 टीप: सरकारी लोकांशी सौम्य व्यवहार ठेवा.
🧘 उपाय: श्रीविष्णू पूजा, तुलसीला जल अर्पण.

८ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शनि आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही समतोल स्वभावाचे असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही समांतर विचार करतात. तुम्ही कडक शिस्तीचे आहात. तुम्ही निश्चयी आणि कर्तव्य तत्पर आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात तसेच बहुतेक गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करतात. तुम्ही कधीही अतिउत्साही नसतात. थोडेफार उदास असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी असतात. कधी कधी तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि योग्य गोष्टींबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तुमच्याकडे अधिकार आणि जोम भरपूर आहे. व्यवहारीक गोष्ट तुम्ही सुलभपणे हाताळतत्. तुम्ही इतरांच्या अनावश्यक जबाबदाऱ्या उगाचच खांद्यावर घेतात. कधीकधी जीवनात तुम्हाला नैराश्य येते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळले पाहिजेत.

व्यवसाय:- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, लाकूड, कोळसा, लोखंड संबंधित व्यवसाय. व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ अंक:- एक, तीन, आठ.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!