✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
🔯 आषाढ कृष्ण सप्तमी/अष्टमी | काळाष्टमी
📅 शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू
🌌 चंद्र नक्षत्र – रेवती | आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन
🕜 राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
📌 टीप: नावावरून राशी ठरवू नका. अधिक माहितीसाठी “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya Today
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्राची बुध व शुक्राशी शुभ युती लाभदायक ठरेल. आजचा दिवस आनंददायी. व्यय स्थानी चंद्र असूनही जमीन व्यवहारातून फायदा, सहलीचे बेत, पशुधनवाढीचे संकेत.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
अनुकूल ग्रहमान. व्यवसायात लाभ. कलाकारांना संधी. प्रेमीजनांसाठी रम्य दिवस. लेखकांसाठी प्रेरणादायक वेळ. मात्र सरकारी नियमांचे पालन गरजेचे.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यवसाय वृद्धीस पोषक काल. आर्थिक आवक उत्तम. मान-सन्मान. महिला सहकाऱ्यांकडून सहकार्य. चैनीसाठी खर्च. वक्तृत्व कौशल्य गाजवता येईल.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आज सौख्य व समाधानदायक अनुभव येतील. वाहनसौख्य, मित्रमंडळींची भेट, इच्छा पूर्ती. कार्यक्षमता वाढून महत्त्वाची कामे पार पडतील.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
संमिश्र दिवस. स्त्री धनात वाढ, उद्योगात भरभराट. वाहनखरेदीसाठी खर्च. महिलांसाठी शुभ काळ. जमिनीचे व्यवहार यशस्वी.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
सप्तम स्थानातील चंद्र आर्थिक लाभदायक. वाहनसुख, सहल, योग्य व्यक्तींशी संपर्क. मात्र सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
अनुकूल दिवस. व्यापारात फायदा. धातू, दागिने, वस्त्र व्यवसायासाठी चांगला काळ. कार्यक्षमता वाढेल, प्रवासात अडचणी संभवतात.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
जवळचे प्रवास, नव्या संधी, संततीशी सुसंवाद. शेअर बाजारात गुंतवणुकीस योग्य वेळ. शत्रूपासून सावध राहा.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संमिश्र दिवस. सौख्य लाभेल पण घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुप्त शत्रू त्रासदायक ठरतील. नैतिकता जपा.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
अत्यंत अनुकूल ग्रहमान. व्यवसाय वृद्धी, आर्थिक स्थैर्य, जोडीदाराकडून उत्तम सहकार्य. आज महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
द्वितीय स्थानातील चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. उधारी वसूल होईल. नफा मिळेल. वाहन व गृहसौंदर्य वृद्धी. आरोग्य जपा.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
स्वतःच्या राशीत चंद्र. मन प्रसन्न. लाभदायक व्यवहार. मेजवानी, वेगवान कामे. कलाकारांना यश. सामाजिक कार्य करताना संयम ठेवा.
१७ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. तुम्ही शांतताप्रिय असून लोक कल्याणाकरिता प्रयत्न करतात. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही बुद्धिमान,धाडसी, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहात. संशोधन आणि ज्ञान यांची तुम्हाला आवड असते. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारांतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही समतोल स्वभावाचे असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही समांतर विचार करतात. तुम्ही कडक शिस्तीचे आहात. तुम्ही निश्चयी आणि कर्तव्य तत्पर आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात तसेच बहुतेक गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करतात. तुम्ही कधीही अतिउत्साही नसतात. थोडेफार उदास असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी असतात. कधी कधी तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि योग्य गोष्टींबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तुमच्याकडे अधिकार आणि जोम भरपूर आहे. व्यवहारीक गोष्ट तुम्ही सुलभपणे हाताळतत्. तुम्ही इतरांच्या अनावश्यक जबाबदाऱ्या उगाचच खांद्यावर घेतात. कधीकधी जीवनात तुम्हाला नैराश्य येते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळले पाहिजेत. काही वेळा तुमच्यातील भित्रेपणा तुम्हाला धक्का देऊ शकतो. इतरांवर वर्चस्व गाजवणे तुम्हाला आवडते.
व्यवसाय:- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, लाकूड, कोळसा, लोखंड संबंधित व्यवसाय. व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ अंक:- एक, तीन, आठ.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली विश्लेषण, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521
“शुभ दिवसाच्या शुभेच्छा!” 🌸

[…] आजचे राशिभविष्य -गुरुवार,१७ जुलै २०२५… […]