अभिजीत खांडकेकरचं दमदार पुनरागमन!
‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गॅंगवार’ नव्या रूपात २६ जुलैपासून झी मराठीवर
मुंबई, दि. १७ जुलै २०२५ – (Chala Hawa Yeu Dya) झी मराठीवरील प्रेक्षकप्रिय हास्यविनोदाचा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ नव्या रंगात आणि नव्या दमात परत येतोय! यंदाच्या पर्वाची विशेष गोष्ट म्हणजे याचे सूत्रसंचालन करणार आहे प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर.(Abhijeet Khandkekar) गेल्या काही काळात अभिनयाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमठवणारा अभिजीत आता निवेदनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठी आणि अभिजीत यांचं नातं हे विशेष आहे. “माझ्या करिअरची सुरुवातच झी मराठीच्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून झाली. त्यामुळे या चॅनलसोबतचं माझं नातं खूप खास आहे,” असं सांगत अभिजीतने आपल्या नवीन प्रवासाविषयी उत्साह व्यक्त केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya)च्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार असून त्यांचं निवड ऑडिशनद्वारे झाली आहे. यावेळी नव्या हास्यकलाकारांना मंच मिळणार आहे आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे. या हास्ययात्रेचं नवं पर्व ‘कॉमेडीचं गॅंगवार’ नावाने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे, जे २६ जुलैपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होईल.
अभिजीतने स्पष्ट केलं की, “गेल्या दहा वर्षांत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. आता त्या पातळीवरून कार्यक्रमाला पुढे नेणं हे निश्चितच एक मोठं आव्हान आहे. पण मला कुठलंच दडपण नाही. मी माझ्या पद्धतीने नव्याने सुरुवात करणार आहे.”
कार्यक्रमाच्या टीमबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, “श्रेया, कुशल, गौरव, प्रियदर्शन आणि भरत दादांसोबत माझं बॉण्डिंग आधीपासूनच आहे. त्यामुळे आता त्याच टीमचा भाग म्हणून काम करणं ही माझ्यासाठी मजेदार गोष्ट ठरणार आहे.”
कार्यक्रमात यावेळी काही नवीन बदल करण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. अभिजीतच्या मते, “हे नवं पर्व केवळ हास्यनिर्मितीपुरतंच मर्यादित नसून नव्या कलाकारांना एक मोठा व्यासपीठ देण्याचं माध्यम ठरणार आहे.”
अभिजीत खांडकेकरच्या दमदार कमबॅकमुळे ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गॅंगवार’ चं हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या अधिकच जवळ जाईल, अशी अपेक्षा आहे.
📺 बघायला विसरू नका:
‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गॅंगवार’
प्रसारण: २६ जुलैपासून, शनि-रवि रात्री ९:०० वा.
झी मराठीवर!