आजचे राशीभविष्य -शनिवार, २६ जुलै २०२५

२६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये

1

🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
🌙 श्रावण शुक्ल द्वितीया/तृतीया | विश्वावसुनाम संवत्सर | शके १९४७, संवत २०८१
🕤 राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०
🪔 “आज व्यतीपात वर्ज्य दिवस आहे”
🔮 आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क/सिंह (व्यतिपात योग, नक्षत्र गंडांत) *विषकन्या योग*
📿 दर शनिवारी नरसिंह, पिंपळ, शनी व मारुती पूजन अवश्य करावे.

Marathi Rashi Bhavishya

🔯 मेष: आज प्रेम आणि संपत्ती दोन्ही मिळतील. व्यापारात यश मिळेल. दिवस आनंददायी!
🔯 वृषभ: कलाकारांना चांगला काळ. आर्थिक लाभ, पण विचित्र निर्णय टाळा.
🔯 मिथुन: स्वप्ने सत्यात उतरतील. विवाहयोग्यांना शुभवार्ता. निर्णय काळजीपूर्वक घ्या.
🔯 कर्क: व्यवसायात उत्तम वाढ. सुखसंपत्तीवर खर्च. दिवस तुमचाच!
🔯 सिंह: आध्यात्मिक लाभ. संध्याकाळी मन प्रसन्न होईल. कामाचा थोडा तणाव.
🔯 कन्या: व्यावसायिक यश. प्रवासात त्रास शक्यतो टाळा. महिलांसाठी शुभ दिवस.
🔯 तुळ: वाहन लाभ, सुखद अनुभव, आर्थिक फायदा. लॉटरीतून यश मिळू शकते.
🔯 वृश्चिक: आर्थिक स्थैर्य, नवीन संधी, भागीदारी यशस्वी. सासरहून लाभ.
🔯 धनु: अष्टमचा चंद्र थोडा अडथळा. पण संध्याकाळ भरभराटीची. आरोग्याची काळजी घ्या.
🔯 मकर: सरकाराशी काम यशस्वी, पण व्यसनांपासून सावध रहा. आर्थिक धोका टाळा.
🔯 कुंभ: प्रेमात यश. नवीन संधी. घरात वाद संभवतो. संयम ठेवा.
🔯 मीन: गुंतवणुकीतून फायदा. प्रश्न मार्गी लागतील. घरात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता.

२६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शनि आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. चांगले दिसण्याकडे कल असतो. स्वतःच्या घराबद्दल आणि प्रियजनांबद्दल ओढ असते. मोठ्या महत्वाकांक्षी योजना पार पाडण्यात तुम्हाला आनंद वाटतो. तुमच्यात दांडगा उत्साह असतो. तुम्हाला भावना व्यक्त करता येत नाहीत. तुम्ही मनाने चंचल असून वृत्ती अस्थिर असते. फार कष्ट न करता आयुष्याचा उपभोग घ्यावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. तुम्ही शांतताप्रिय असून लोक कल्याणाकरिता प्रयत्न करतात. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही बुद्धिमान,धाडसी, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहात. संशोधन आणि ज्ञान यांची तुम्हाला आवड असते. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारांतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही समतोल स्वभावाचे असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना तुम्ही समांतर विचार करतात. तुम्ही कडक शिस्तीचे आहात. तुम्ही निश्चयी आणि कर्तव्य तत्पर आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दलचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात तसेच बहुतेक गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करतात. तुम्ही कधीही अतिउत्साही नसतात. थोडेफार उदास असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असते. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी असतात. कधी कधी तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि योग्य गोष्टींबद्दल तुम्हाला आदर असतो. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तुमच्याकडे अधिकार आणि जोम भरपूर आहे. व्यवहारीक गोष्ट तुम्ही सुलभपणे हाताळतत्. तुम्ही इतरांच्या अनावश्यक जबाबदाऱ्या उगाचच खांद्यावर घेतात. कधीकधी जीवनात तुम्हाला नैराश्य येते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळले पाहिजेत. काही वेळा तुमच्यातील भित्रेपणा तुम्हाला धक्का देऊ शकतो. इतरांवर वर्चस्व गाजवणे तुम्हाला आवडते.

व्यवसाय:- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, लाकूड, कोळसा, लोखंड संबंधित व्यवसाय. व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ अंक:- एक, तीन, आठ.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📞 संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521 – कुंडली परीक्षण व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कॉल करा.

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशीभविष्य -शनिवार, २६ जुलै २०२५ […]

Don`t copy text!