नाशिक, दि. २७ जुलै २०२५ – Nashik Political News नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करत, शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आणि विविध संघटनांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सुनील बागुल व मामा राजवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सामूहिक प्रवेशामुळे नाशिक महानगरातील भाजपची ताकद अधिक भक्कम झाली आहे.
या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याला व्यासपीठावर भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, मंगेश चव्हाण, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, गिरीष पालवे व दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
✳️ पक्ष प्रवेश करणारे काही प्रमुख चेहरे(Nashik Political News)
सुनील बागुल – उपनेते, शिवसेना (उबाठा)
मामा राजवाडे – महानगर प्रमुख, शिवसेना (उबाठा)
अजय दिलीप बागुल – जिल्हाध्यक्ष, श्रमिक सेना
भगवंत पाठक – लोकसभा संघटक, शिवसेना
मनिष (शंभू) बागुल – ग्रामिण लोकसभा विस्तारक
जगदीश अपसुंदे – संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रकाश पवार, शरद चिखले, राजु साबळे, अरुण थोरात (मनसे),
रामसिंग राजपूत, शशांकसिंग राजपूत, रोशनसिंह राजपूत – राजपुत करणी सेना
सागर बागुल, योगेश नाटकर, निलेश मोरे – मराठा महासंघ
नितीन निगळ – युवक काँग्रेस (राष्ट्रवादी)
सचिन देवरे – अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन
महेंद्र शर्मा, दिनेश जाधव, सलाम खान, जयेश सूर्यवंशी – श्रमिक हॉकर्स सेना
छाया राजपूत, प्रियदर्शिनी काकडे, कस्तुरी आटवणे, स्वाती साळवे, सोनल दाभाडे, शोभा रौदळ, सुमन मुर्तडक, रंजना शिरसाठ, भारती घुमरे – महिला आघाडी व विविध संघटनांतील पदाधिकारी
या प्रवेशामुळे नाशिक महानगरात भाजपच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. ना. गिरीष महाजन यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत भाजपच्या “विकास आणि विश्वास” या मंत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.