आजचे राशिभविष्य-मंगळवार, २९ जुलै २०२५

२९ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये

1

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

🔯 श्रावण शुक्ल पंचमी (नागपंचमी)

📜 शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर | दक्षिणायन

🌧️ ऋतु वर्षा

🕒 राहुकाळ दुपारी ३:०० ते ४:३०

🌙 चंद्र नक्षत्र उत्तरा / हस्त

👶 आज जन्मलेल्यांची राशी कन्या

🔮 विशेष:

आजचा दिवस शुभ आहे. नागपंचमी, मंगळागौरी पूजन, श्रावणी यजुर्वेद विधी धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.

🔥 राशीभविष्य: (Marathi Rashi Bhavishya)

🐏 मेष:

आज वक्तृत्वात चमक दिसेल. सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. जमीन किंवा शेतीतून लाभ होईल. मात्र जुने आजार डोके वर काढू शकतात, आरोग्याची काळजी घ्या.

🐂 वृषभ:

प्रगतीकारक दिवस. गुंतवणुकीस योग्य वेळ. शेअर बाजारातून लाभ संभवतो. युवतींनी आकर्षणापासून दूर राहा. संयम ठेवणे आवश्यक.

👫 मिथुन:

भावनिक व संवेदनशील राहाल. स्थावर मालमत्तेबाबत चर्चा होईल. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने थोडं खिन्न वाटेल. भावंडांशी वाद संभवतो.

🦀 कर्क:

व्यवसायवृद्धीसाठी उत्तम कालावधी. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक प्रवृत्ती सक्रिय राहील. देवदर्शनासाठी वेळ द्या. नात्यांतून लाभ संभवतो.

🦁 सिंह:

राशीस्वामी असंतुष्ट असले तरी इतर ग्रह अनुकूल. आर्थिक लाभ होतील. महिलांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आत्मविश्वास घटेल, आरोग्याची काळजी घ्या.

👧 कन्या:

तुमच्याच राशीत चंद्र आणि मंगळ आहे. प्रभाव वाढेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. कर्जवसुली शक्य. भागीदारीत संयम ठेवा.

⚖️ तुळ:

थोडी प्रतिकूलता. नोकरीत सुखद अनुभव संभवतो. वरिष्ठ समाधानी राहतील. स्त्रीधन वाढेल. जुने दुखणे त्रास देऊ शकते. पाण्यापासून दक्षता घ्या.

🦂 वृश्चिक:

चंद्र अनुकूल आहे. मेहनत फळाला येईल. राजकीय प्रगती संभवते. कार्यक्षमतेत वाढ. इच्छित गोष्टी साध्य होऊ शकतात.

🏹 धनु:

सरकारी कामात यश. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. आर्थिक लाभ होतील. पाण्याशी संबंधित ठिकाणी काळजी घ्या.

🐊 मकर:

नवमस्थानी चंद्र आहे. व्यवसायात भरभराट. आर्थिक प्रश्न सुटतील. शेअर्समध्ये लाभ संभवतो. सहकार्य मिळेल.

🏺 कुंभ:

अष्टमस्थानी चंद्र व मंगळ आहेत. सावध राहा. धाडसी निर्णय टाळा. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. हरवलेली वस्तू मिळू शकते.

🐟 मीन:

सप्तमस्थानी चंद्र आहे. कोर्टाच्या बाबतीत यश. शत्रूंचा पराभव. आर्थिक प्रगती. हाती घेतलेले कार्य पूर्ण होईल. नवीन संधी चालून येतील.

२९ जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर चंद्र नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही लहरी असल्याने तुमच्या कृतीमध्ये अनिश्चितता असते. तुमच्यात धैर्य व धीटपणा असतो. आयुष्यात कोणताही धोका पत्करायची तयारी असते पण चिकाटी नसते. आर्थिक लाभावर दृष्टी असते. संसारात मतभेद असू शकतात. तुमचे आयुष्य उलाढालीचे असते. जीवनामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचे त्याबद्दल तुम्ही खूप मोठमोठी स्वप्न रंगवता. प्रत्येक कामाबद्दल उत्साही असतात. क्वचित प्रसंगी इतरांनी आपल्या मताचे अनुकरण करावे अशी अपेक्षा करता. ज्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल असे प्रसंग तुम्ही स्वतःच निर्माण करता व त्यामध्ये तुम्ही नायिकेची भूमिका बजावता. जीवनामध्ये त्याच त्याच गोष्टी करायला तुम्हाला आवडत नाही. स्वतःच्या स्वप्नामध्ये रंगण्यात अधिक आनंद मिळतो. त्यामुळे बऱ्याच वेळा एककल्ली जिवन जगता. तुमच्यातल्या उदारपणामुळे इतरांना तुम्ही प्रिय असतात. बराच वेळा इतरांना नाराज करणे तुम्हाला कठीण जाते. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही उत्तम तऱ्हेने प्रत्यक्षात रूपांतर करता. रम्य विषयाशी समरस होण्याची वृत्ती असते. निसर्गसौंदर्य, समुद्र वगैरे गोष्टींशी एकरूप होणे तुम्हाला प्रिय असते. आकाशाकडे किं

शुभ रंग:- पांढरा, निळा किंवा क्रीम

शुभ दिवस:- सोमवार ,गुरुवार शुक्रवार

शुभ रत्न :- मोती, हिरा चंद्रमणी किंवा गोमेद.

 

📞 कुंडली विश्लेषण, भविष्यपथ, जोडीदार जुळवणी, ग्रहदशा तपासणीसाठी संपर्क:

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक ☎️ 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य-मंगळवार, २९ जुलै २०२५… […]

Don`t copy text!