क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो २०२५ :नाशिककरांच्या‘ड्रीम होम’चे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी

१४ ते १८ ऑगस्ट दरम्यान नाशिक मध्ये आयोजन

1

नाशिक, दि. ४ ऑगस्ट २०२५ CREDAI Property Expo नाशिकमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी आहे. बांधकाम व्यावसायिकांची देशातील आघाडीची संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्यातर्फे १४ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान सिटी सेंटर मॉल जवळील ठक्कर डोम येथे ‘क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात ८० हून अधिक विकसक सहभागी होणार असून ५०० पेक्षा अधिक प्रॉपर्टीचे पर्याय एका छताखाली पाहता येणार आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा, बजेट आणि पसंतीनुसार प्रॉपर्टी निवडणे सोपे होणार आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी ही माहिती दिली.

नाशिकच्या विकासाचा नवा टप्पा(CREDAI Property Expo)

गौरव ठक्कर म्हणाले, “नाशिक हे प्रगतिशील शहर असून येथे स्वतःचे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. हे प्रदर्शन नागरिकांना घरासाठी योग्य पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.”

प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी नाशिकच्या भविष्यातील प्रगतीचा आढावा दिला. ऋषिकेश कोते म्हणाले की, “नाशिकमध्ये येत्या काही वर्षांत भरीव विकास होणार आहे. येथील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक आणि आयटी प्रगती, पर्यटन संधी यामुळे नाशिक हे गुंतवणुकीसाठी एक उत्तम केंद्र ठरेल.”

महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराची झपाट्याने वाढ

नरेंद्र कुलकर्णी यांनी नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीबद्दल सांगताना काही महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली:

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

समृद्धी महामार्ग

चेन्नई-सुरत एक्सप्रेस वे

नाशिक-वाढवण बंदर रस्ता

या सर्व प्रकल्पांमुळे नाशिक हे ‘रिअल इस्टेट हॉटस्पॉट’ बनण्याच्या मार्गावर आहे.

लकी ड्रॉद्वारे स्टॉल वाटप

मानद सचिव तुषार संकलेचा यांनी सांगितले की प्रदर्शनाच्या स्टॉलसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला असून विविध विकसकांना त्यांच्या स्टॉल्स निश्चित करण्यात आले आहेत.

आर्थिक विकासाला चालना

उपाध्यक्ष उदय घुगे व एक्सपो कमिटीचे मनोज खिवंसरा यांनी विश्वास व्यक्त केला की, “या प्रदर्शनामुळे नाशिकच्या अर्थकारणाला सकारात्मक दिशा मिळेल. रिअल इस्टेट हे क्षेत्र शहराच्या आणि देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलते.”

भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्टला

प्रॉपर्टी एक्सपोचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आयोजक मंडळ आणि सहकार्य

या भव्य आयोजनामागे क्रेडाई नाशिक मेट्रोचे पदाधिकारी आणि सदस्यांचे विशेष योगदान आहे. आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड यांच्यासह अनेक सदस्य आणि क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर यांचे समन्वय लाभत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!