आजचे राशीभविष्य – मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५
५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
🔯 तिथी व वार:
श्रावण शुक्ल एकादशी/द्वादशी | पुत्रदा एकादशी |
विश्वावसुनाम संवत्सर | शके १९४७, संवत २०८१
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ/मूळ | एइन्द्र योग | विष्टी करणं |
📌 आज वर्ज्य दिवस आहे.
💫 आज जन्मलेल्यांची राशी: वृश्चिक (११.२३ पूर्वी)/धनु (११.२३ नंतर)
⛔ राहुकाळ: दुपारी ३:०० ते ४:३०
(Marathi Rashi Bhavishya)
🔥 मेष
अडचणींचा दिवस. शत्रूपासून त्रास संभवतो. अनावश्यक धाडस करू नका. प्रवासात अडथळे. वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
🌱 वृषभ
सकाळ लाभदायक. आर्थिक फायदे संभवतात. परंतु संध्याकाळी मतभेद वाढू शकतात. मन चिंतीत राहील. शांततेने दिवस सावरणे हिताचे.
💨 मिथुन
सकाळी लाभ, पण नंतर काळजीचा दिवस. शत्रू त्रास देतील. घरगुती वातावरण तणावपूर्ण. देवपूजेमुळे मन स्थिर राहील.
🌊 कर्क
स्फूर्तीमय दिवस. धार्मिक कामासाठी वेळ मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. परंतु दुपारी ग्रहमान प्रतिकूल. संयम ठेवा.
🔥 सिंह
प्रतिष्ठेचा मोह टाळा. खोट्या गोष्टींपासून दूर राहा. राजकारणात यश नाही. संध्याकाळी मित्रांशी मतभेद होऊ शकतात. पाण्यापासून काळजी घ्या.
🌾 कन्या
संधी मिळेल, पण मर्यादित. व्यावसायिक कामांमध्ये प्रगती. भावनिक अस्थिरता. गृहकलह टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
⚖️ तुळ
सकाळी मन अस्थिर. खर्च वाढण्याची शक्यता. नातेसंबंधात कटुता. आरोग्याबाबत सतर्कता आवश्यक. पचनसंस्थेशी निगडित त्रास संभवतो.
🦂 वृश्चिक
सकाळी अनुकूल. आत्मविश्वास वाढेल. परंतु संध्याकाळी नातेसंबंधात तणाव. शेअरबाजारात गुंतवणूक टाळावी.
🏹 धनु
सकाळी दिवस छान सुरू होईल. नंतर अचानक अडचणी येतील. नोकरीतील अधिकार कमी होण्याची शक्यता. वादविवाद टाळा.
🪙 मकर
सकाळी चांगला कालावधी. सरकारी कामासाठी योग्य वेळ. नातलगांची मदत करावी लागेल. प्रवासात त्रास संभवतो.
🌬 कुंभ
चंद्र अनुकूल पण मंगळ अडथळा आणतो. अचानक समस्या संभवतात. आर्थिक ताणतणाव. उधारी देणे टाळा.
🌊 मीन
संधी आणि संकट एकत्र. सरकारी व्यक्तीकडून त्रास संभवतो. कोर्ट-कचेरीत अपयश. शत्रूपासून सावध राहा. संयम आवश्यक.
५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि बुध, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. बुध ग्रहाच्या स्वामीत्वाखाली असल्याने हुशार, तल्लख, शास्त्रीय विषयाची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे, झटपट काम करणारे आहात. व्यवहार चातुर्य असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून तुम्हाला आळशीपणा खपत नाही. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता. कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे आपोआप मार्गदर्शन मिळते. मनाने विशाल असून मानवी मनाचे उत्तम आकलन असते. थिएटर्स, सिनेमा ,सहली प्रशिक्षण वर्ग यांची आवड असते. तुमच्यात बऱ्याच कला असतात आणि त्या उत्स्फूर्त असतात. तुम्ही साशंक वृत्तीचे असून स्वतःची खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही गोष्टीचा अचूक अंदाज करण्याची वृत्ती असते. महत्त्वकांक्षा व उत्साह असून चिकाटी चांगले असते. हुशार व बुद्धिमान लोकांकडे तुमचा ओढा असतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही यशस्वी रीतीने व्यापार करू शकता. पैशाची आवक चांगली असते. अनेक गोष्टी त रस घेतात. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडण्यात तुमचा हातखंडा असतो. स्वार्थ त्याग हे तुमचे वैशिष्ट्ये आहे. मुलांच्या व पतीच्या सुख सोयी कडे तुमचे बारकाईने लक्ष असते. तुम्ही आपले घर उत्तम तऱ्हेने सांभाळतात. टापटीप आवडत असली तरीही स्वतः फारसे कष्ट घेत नाहीत.
शुभ दिवस:- रविवार ,सोमवार शनिवार
शुभ रंग:- निळा, करडा, पांढरा मरून
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)
📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521
(व्यवसाय, आरोग्य, विवाह, संतान, भाग्य, रत्न, उपाय योजना – सर्व काही सल्लामूल्य उपलब्ध.)

[…] […]