नाशिकमध्ये सहावीतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेत हार्टअटॅकने मृत्यू

बालवयात वाढत्या हार्ट अटॅकच्या घटनांनी चिंता

0

नाशिक, ६ ऑगस्ट २०२५ Nashik girl heart attack नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेलरोड परिसरातील एका इंग्रजी माध्यम शाळेत शिकणारी श्रेया किरण कापडी या सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळच्या सत्रात शाळेच्या गेटमधून आत जाताना तिला अचानक चक्कर आली आणि ती मैदानावर कोसळली. तात्काळ शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

श्रेया ही मूळची सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावची असून नाशिकमध्ये राहून शिक्षण घेत होती. तिच्यावर देशवंडीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया कापडी हिच्या अचानक निधनाने संपूर्ण शाळा आणि परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई-वडील आणि एक लहान बहीण आहे.

बालवयात हार्ट अटॅकचे वाढते प्रमाण :(Nashik girl heart attack)

श्रेया हिला पूर्वीपासूनच थोडा श्वास घेण्याचा त्रास असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पण एवढ्या लहान वयात हार्ट अटॅकने मृत्यू होणं ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा घटना वेळीच ओळखल्या गेल्या नाहीत तर त्याचे प्राणघातक परिणाम होऊ शकतात.

भारतासारख्या देशात आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका तुलनेत जास्त आहे. पण अलीकडच्या काळात लहान वयातील मुलांमध्येही हा धोका मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. यामागील प्रमुख कारणांमध्ये बदलती जीवनशैली, चुकीचं खाणं, जास्त वेळ मोबाईल व स्क्रीनवर घालवणं, व्यायामाचा अभाव आणि वाढती लठ्ठपणाची प्रवृत्ती ही कारणं अधोरेखित केली जात आहेत.

शाळांमध्ये हेल्थ चेकअप गरजेचे :

या घटनेनंतर अनेक पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणीचे महत्व अधोरेखित केले आहे. बालवयात हृदयाच्या तक्रारी दुर्लक्षित केल्या गेल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे शाळांनी सहकार्य करून आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे अशी मागणी होत आहे.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

मुलांमध्ये श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणं, किंवा थकवा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दरवर्षी किमान एकदा मुलांचं संपूर्ण आरोग्य तपासणं करावं.

मुलांना नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पर्याप्त झोप मिळते आहे का, यावर लक्ष ठेवा.

डिजिटल डिव्हाइसेसचा वापर मर्यादित ठेवा.

हृदयविकाराचे कौटुंबिक इतिहास असेल, तर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

नाशिकमधील श्रेया कापडी हिच्या मृत्यूने संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. लहान वयात हृदयविकाराचे झटके हे केवळ वैद्यकीयच नाही तर सामाजिक चिंता बनली आहे. वेळेवर लक्ष दिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. पालक, शिक्षक आणि समाज म्हणून आपण एकत्र येऊन यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!