नाशिक | ६ ऑगस्ट २०२५ – CREDAINashik Metro PropertyExpo स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिककरांना सुवर्णसंधी मिळणार आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित ‘नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ’ या भव्य गृहप्रदर्शनाचे आयोजन १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोम, नाशिक येथे करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
नाशिकच्या उज्वल भविष्याची दिशा(CREDAINashik Metro PropertyExpo)
या प्रदर्शनाबाबत माहिती देताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की, “नाशिकच्या सर्वांगीण विकासामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आता अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. उत्तम हवामान, मुबलक पाणी, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि जीवनशैलीतील दर्जा यामुळे नाशिक हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण बनत चालले आहे.”
५०० हून अधिक प्रॉपर्टी पर्याय, ८० विकसकांची उपस्थिती
प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, “या प्रदर्शनात शहरातील नामांकित ८० पेक्षा अधिक विकसक सहभागी होत असून ५०० हून अधिक प्रकल्प व पर्याय यामध्ये उपलब्ध असतील. फ्लॅट्स, प्लॉट्स, दुकाने, ऑफिसेस अशा विविध प्रॉपर्टी प्रकारांचा समावेश आहे. यासोबतच आघाडीच्या बँका व गृहकर्ज संस्था देखील सहभागी होणार आहेत.”
कुंभमेळा आणि नाशिकचा झपाट्याने विकास
नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, “आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे. रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने शहराची जोडणी भक्कम होत असून नाशिक हे औद्योगिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कृषिपूरक संधींनी परिपूर्ण शहर म्हणून उभं राहत आहे.”
प्रदर्शनासाठी संघटनात्मक ताकद
या यशस्वी प्रदर्शनामागे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या संपूर्ण संघाची मेहनत असून मानद सचिव तुषार संकलेचा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, मनोज खिवंसरा आदींनी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले आहे. याशिवाय क्रेडाई युवा विंगचे समन्वयक आदित्य भातंबरेकर व अजिंक्य नाहर यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
नाशिककरांसाठी घर खरेदीची सुवर्णसंधी
‘नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ’ हे प्रदर्शन नाशिककरांसाठी केवळ घर खरेदीचं नव्हे, तर भविष्यातील स्मार्ट गुंतवणुकीचं दालन उघडणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात सर्व स्तरातील लोकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध असतील, तसेच गृहकर्ज सल्ला, स्कीम्स व सवलती देखील मिळणार आहेत.