आजचे राशिभविष्य गुरूवार, ७ ऑगस्ट २०२५

७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
श्रावण शुक्ल त्रयोदशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १०४७, संवत २०८१. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे” घबाड दुपारी २.०१ नंतर.
चंद्र नक्षत्र – पू. षा./उ. षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/ (रात्री ८.११ नंतर) मकर. (विष्काम्भ योग शांती करून घेणे)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.
(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुम्ही परखड, स्पष्टवक्ते आणि स्वतःच्या कामाशी काम असणारे आहात. आज त्याचा प्रत्यय येईल. नात्यातून मदत मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. साडेसाती चालू आहे. दीर्घकालीन नियोजन करावे लागेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमचा कलेकडे ओढा असतो. सौंदर्याची आणि निसर्गाची आवड आहे. आज सुवासिक द्रव्याचा लाभ होईल. धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. गायकांना चांगल्या संधी प्राप्त होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रणयरम्य दिवस आहे. प्राइय व्यक्तीचा सहवास अनुभवाल. आत्मविश्वास कमी होऊ नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा. इतरांचे चांगले करण्याचा प्रयत्न कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. नवीन कामाचे नियोजन कराल. आर्थिक चिंता मिटेल. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. मित्रमंडळी भेटतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुम्ही गोड बोलून काम करून घेऊ शकतात. तुमच्या अधिकाराचा आणि पदाचा आज योग्य वापर कराल. अचानक धनलाभ होऊ शकतो. कामे पूर्ण होतील. मात्र सूर्य अनुकूल नाही. त्यामुळे नावलौकीकसाठी अधिक खर्च करावा लागेल.
 कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दर्जा नियंत्रण करणे तुम्हाला अगदी सहज जमते. आज त्याचा योग्य वापर कराल. जमीन व्यवहारातून नफा वाढेल. शेतीची कामे कराल. व्यावसायिक वाढ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सभ्यता आणि सुसंस्कृत ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. शांतपणे तुम्ही तुमचे काम पूर्ण करतात. आज त्याचाच अवलंब करावा लागेल. नात्यातून लाभ होतील. नवीन व्यवसाय वाढ होऊ शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सलगपणे अनेक तास काम करण्याची तुमची क्षमता आहे. आज त्याची प्रचिती येईल.  कौटुंबिक सौख्य लाभेल. कर्तव्य पूर्ण होईल. वारसा हक्काने धन संपत्ती मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. चांगली बातमी समजेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
   मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नाही. खर्चात वाढ संभवते. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. संध्याकाळ मन उत्साही राहील. भाग्योदय होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. महत्वाची कामे या वेळेत पूर्ण करून घ्या. गुप्त संपत्तीचा लाभ होईल. संध्याकाळ नंतर मन उदास राहील. आत्मचिंतन कराल.
  मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज महत्वाची कामे पूर्ण करा. ग्रहमान तुमची परीक्षा घेत आहे. मात्र निराश होऊ नका. संयम ठेवा. उपासना करा. संध्याकाळ नंतरचे दोन दिवस प्रगतिकारक आहेत.
७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने विशाल असून मानवी जीवनाची तुम्हाला उत्तम जण आहे. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात. तुम्हाला उच्च आध्यत्मिक अनुभूती प्राप्त होतात. तुम्ही भरपूर पैसे कमवतात. तुमचा स्वभाव नैसर्गिकपणे अस्वस्थ आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही.  तुम्ही उत्तम सल्लागार आहात. तुम्हाला आदर मिळतो. तुंचायत प्रतिष्ठा, अधिकार, मोठेपणा आणि कल्पकता आहे. तुम्ही मनाने मोठे असून कृतीत मोकळेपणा आहे. तुम्ही व्यावहारिक प्रथांचा स्वीकार करतात पण लवकरच त्यास कंटाळून बंड करतात. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात.  दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो.
व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा आणि निळा.
शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.
 (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!